Vinayak Raut Daughter-in-law: मी नाजूक मुलगा, तू मला हात लावू नको; विनायक राऊत यांच्या सूनेचा खळबळजनक खुलासा

Girija Raut: सध्या माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत हे चर्चेत आहेत. त्यांची पत्नी गिरिजा राऊत यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

Vinayak Raut Daughter-in-law: मी नाजूक मुलगा, तू मला हात लावू नको; विनायक राऊत यांच्या सूनेचा खळबळजनक खुलासा
Gitesh Raut
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 12, 2026 | 11:30 AM

सध्या शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत खासगी आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. गितेश राऊत यांच्या पत्नीने पोलिसात राऊत कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. गिरिजा राऊत यांनी तक्रारीमध्ये पती गितेश राऊत यांच्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी नाजूक मुलगा म्हणत…

गिरिजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात नवरा गितेश राऊत आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी हनीमूनसाठी ऊटी येथे गेले असताना शारिरीक संबंध न ठेवता अनेक कारणे दिल्याचे देखील सांगितले. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नाहीत, मी खूप नाजूक मुलगा आहे, तू मला हात लावतेस असे बहाणे देत असल्याचे गिरिजा यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन सेक्स

गिरिजा यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, शारीरिक संबंधांवर माझ्या पतीचे असे मत होते की तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन सेक्स करू शकतो. भारतात सेक्स करायला तो comfortable नव्हता. शारीरिक जवळीक साधल्यास मला दूर लोटत तो मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे. तुला अक्कल आहे का? मला असा कसा हाथ लावतेस तू?

पुढे त्यांनी म्हटले की, मुंबईच्या घरी जवळीक साधल्यास आपण इथे कसं काही करणार आईला सगळं ऐकू जाईल. तळगाव, मालवणच्या घरी जवळीक साधल्यास म्हणायचा, इकडे आपण काही करू शकत नाही, खाली रवी दादाला (मदतनीस)सगळं ऐकू जाईल, असेही गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या गंभीर आरोपांवर संबंधितांकडून काय भूमिका मांडली जाते आणि तपासात पुढे काय निष्पन्न होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच थोड्याच वेळात गिरिजा राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या आणखी काय खुलासे करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us