विकासाकडे नेणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक नको : विनायक राऊत

"नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जानतो. त्यामुळे राणेंच्या बकवासगिरीला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही" अशा शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली (Vinayak Raut slams Narayan Rane).

  • विनायक वंजारे, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग
  • Published On - 21:29 PM, 29 Nov 2020
विकासाकडे नेणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल, नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक नको : विनायक राऊत

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. “महाराष्ट्राचा रथ विकासाकडे घेऊन जाणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री आम्हाला चालेल. मात्र नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक आम्हाला नको”, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला. राऊत यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला (Vinayak Raut slams Narayan Rane).

“नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे राणेंच्या बकवासगिरीला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही” अशा शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली (Vinayak Raut slams Narayan Rane).

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही राऊत यांनी भाजपवर घणाघात केला. “मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. सरकार ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार. मात्र भाजपने सत्तेत असताना नेमके काय दिवे लावले?”, असा सवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला.

“मराठा संघटनांमध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांना वस्तूस्थितीची चांगली कल्पना आहे. मात्र, भाजप पुरस्कृत जो एक गट आहे त्यांना अशा प्रकारची अवदसा आठवत आहे”, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला.

“मराठा समाजाला विनंती आहे, आम्ही सर्वजन तुमच्यासोबत आहोत. महाराष्ट्र सरकार तुम्हाला न्याय देणार म्हणजे देणार”, असं आश्वासन विनायक राऊत यांनी दिलं.

आंदोलनाची भाषा करणारे मराठा संघटनांचे नेते भाजपच्या चावीने चालतात: नवाब मलिक

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, “मराठा संघटनांचे जे नेते आंदोलनाची भाषा करत आहेत ते भाजपच्या चावीने चालणारे नेते आहेत. भाजपमुळे हे नेते असं बोलत आहेत”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. “मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याने मोदी सरकारने कायदा करुन मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा :

‘देवेंद्र फडणवीसांच्या हातात सत्ता द्या’; उदयनराजेंनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखवली: दरेकर

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक