AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनता नारायण राणेंना लवकरच त्यांची जागा दाखवेल; शिवसेनेचा पलटवार

"नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीला उद्देशून वापरलेले शब्द न शोभणारे आहेत. जनता त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवेल" असा पलटवार शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केली.

जनता नारायण राणेंना लवकरच त्यांची जागा दाखवेल; शिवसेनेचा पलटवार
| Updated on: Oct 27, 2020 | 12:22 AM
Share

रत्नागिरी : “नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीला उद्देशून वापरलेले शब्द न शोभणारे आहेत. जनता त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवेल” असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केला. भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर राऊत यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली. (Vinayak Raut slams Narayan Rane said people will soon show him his place)

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “पावसाळा संपला असला तरी या बेडकांची डरावगिरी संपलेली नाही. पण त्यांच्या डरावगिरीला कोणी घाबरत नाही. नारायण राणेदेखील कधीकाळी राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला उद्देशून वापरलेले शब्द न शोभणारे आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल.”

दरम्यान, शिवसेना आणि खासदार नारायण राणे यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय. दसरा मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर प्रहार केला होता. शिवसेनेच्या टीकेला उत्तर म्हणून नारायण राणे यांनी मुंबईत सोमवारी (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. त्यानंतर नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेनेही चोख उत्तर दिलंय.

नारायण राणे काय म्हणाले ?

“मुख्यमंत्रिपदावर बसल्यापासून एकही काम उद्धव ठाकरे यांनी नीट केलं नाही. यांना जीडीपी कळत नाही, अर्थव्यवस्था माहिती नाही. अधिकारी हसतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसला आहे. असं नारायण राणे म्हणाले. तसेच, कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे पिंजऱ्यात होते. आत्ता कुठे एका दौऱ्याला ते बाहेर पडले. हे स्वतःला वाघ म्हणतात. हे पिंजऱ्यातील वाघ आहेत का? कालच्या सभेत केवळ 47 लोक टाळ्या वाजवायला होते. मी शिवसेनेत होतो, अनेक पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांनी मला अनेक पदं दिली. मी बेडूक नव्हतो. हे बेडूक आहेत म्हणून त्यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं नाही. बाळासाहेब असते तर त्यांना मुख्यमंत्री केलं नसतं. ते जास्त बोलले तर 47 वर्षात जे केलं ते सर्व बाहेर काढेल, असंही राणे म्हणाले.

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल

दादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे

आज स्पष्ट बोलतोय, सुशांतची आत्महत्या नव्हे तर खून, आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील : नारायण राणे

(Vinayak Raut slams Narayan Rane said people will soon show him his place)

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा