मोठी बातमी! मोदी सरकारला पहिला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिल नामंजूर, काय आहे मतांची आकडेवारी?

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर मतदान पार पडलं आहे. हे विधेयक नामंजूर झालं आहे. बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतांची गरज होती. मात्र तेवढे मतं विधेयकांच्या बाजुने पडले नाहीत.

मोठी बातमी! मोदी सरकारला पहिला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिल नामंजूर, काय आहे मतांची आकडेवारी?
womens reservation and delimitation bill
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 17, 2026 | 8:19 PM

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर मतदान पार पडलं आहे. हे विधेयक नामंजूर झालं आहे. बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतांची गरज होती. मात्र तेवढे मतं विधेयकाच्या बाजुने पडले नाहीत. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजुने 298 मतदान झालं. तर या विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली आहेत. 540 सदस्यांपैकी 528 सदस्यांनी यावेळी मतदान केलं. हे विधेयक मंजूर करण्यासाठी 360 मतांची गरज होती, मात्र त्यासाठी 62 मत कमी पडले आहेत. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर आज संसदेमध्ये मतदान घेण्यात आलं. मात्र हे बिल मंजूर होऊ शकलेलं नाही. सुरुवातीपासूनच या बिलाला विरोधकांचा विरोध होता. हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आज संसदेमध्ये महिला आरक्षण आणि डिलिमेटेशन बिलावर मतदान पार पडलं. मात्र हे बिल संसदेमध्ये पास होऊ शकलं नाही. या बिलाच्या मंजुरीसाठी 540 सदस्यांपैकी 360 मतांची आवश्यकता  होती. मात्र प्रत्येक्षात या विधेयकाच्या बाजुने 298 एवढंच मतदान झालं. 62 मत कमी पडल्यानं हे विधेयक संसदेमध्ये मंजूर होऊ शकलं नाही. या विधेयकाच्या विरोधात 230  मत पडले.  540 सदस्यांपैकी एकूण 528 सदस्यांनी यावेळी मतदान केलं.

दरम्यान हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आमचा महिला आरक्षणाला विरोध नाहीच. मात्र 2023 मध्ये पास झालेलं विधेयक आणा असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तर मणिपूर आणि इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचं उदाहारण देत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

मोदी सरकारला मोठा धक्का  

दरम्यान आज महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर संसदेमध्ये मतदान पार पडलं. हे बिल नामंजूर झालं आहे. हे बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश म्हणजेच 360 मतांची गरज होती मात्र 62 मत कमी पडल्यानं हे विधेयक नामंजूर झालं आहे. हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का आहे. मात्र हे बिल आता जरी नामंजूर झालं असलं तरी देखील आम्ही ते मंजूर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांनी दिली आहे.

 

Follow Us