Washim ZP winner list : वाशिम जिल्हा परिषद निकाल, विजयी उमेदवारांची यादी

वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. 14 पैकी 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आधीच्या 12 आणि आताच्या 5 मिळून 17 जागा झाल्या आहेत.

Washim ZP winner list : वाशिम जिल्हा परिषद निकाल, विजयी उमेदवारांची यादी
वाशिम जिल्हा परिषद इमारत
विठ्ठल देशमुख

| Edited By: सचिन पाटील

Oct 06, 2021 | 5:19 PM

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. 14 पैकी 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आधीच्या 12 आणि आताच्या 5 मिळून 17 जागा झाल्या आहेत. या 14 जागांसाठी एकूण 82 उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात होते. वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची जरी सत्ता असली, तरी या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली.

वाशिम जिल्हा परिषद पोटनिवडणूक विजयी उमेदवार यादी

1) काटा : सौ. संध्याताई देशमुख : कॉंग्रेस 2) पार्डी टकमोर : सौ. सरस्वती मो. चौधरी : अपक्ष 3) उकळी पेन : सुरेश मापारी : शिवसेना 4) आसेगांव : चंद्रकांत ठाकरे : राष्ट्रवादी 5) कंझरा : सुनिता कोठाडे : राष्ट्रवादी 6) दाभा : आर. के. राठोड : राष्ट्रवादी कॉंग्रेस 7) फुलउमरी : सुरेखा चव्हाण : भाजप 8) कुपटा : उमेश ठाकरे : भाजप 9) तळप : शोभा सुरेश गावंडे : राष्ट्रवादी 10) कवठा : वैभव सरनाईक : कॉंग्रेस 11) गोभणी : सौ. पूजाताई भुतेकर : जनविकास 12) भर जहागिर : अमित खडसे : राष्ट्रवादी 13) पांगरी नवघरे : सौ. लक्ष्मी सुनिल लहाने : वंचित 14) भामदेवी : सौ. वैशाली लळे : वंचित

एकूण जागा : 14

निकाल जाहीर : 14

वंचित : 02 अपक्ष : 01 शिवसेना : 01 राष्ट्रवादी : 05 भाजप : 02 काँग्रेस : 02 जनविकास : 01

वाशिम जिल्हा परिषदेची एकूण 52 सदस्य संख्या आहे.

 • राष्ट्रवादी काँग्रेसकडे -12
 • काँग्रेस – 10
 • वंचित -8
 • भाजपा – 7
 • जनविकास आघाडी -7,
 • शिवसेना -6
 • स्वाभिमानी शेतकरी संघटना- 1
 • अपक्ष -1

असं संख्याबळ होतं. त्यानंतर रिक्त झालेल्या जागा 14 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली

कोणत्या पक्षाच्या किती जागा रिक्त झाल्या होत्या?

 • वंचित -4
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या-3
 • भाजप -2
 • जन विकास आघाडीच्या- 2
 • काँग्रेस -1
 • शिवसेनेची-1
 • अपक्ष -1

संबंधित बातम्या  

Washim ZP election result live : वाशिम जिल्हा परिषदेत काट्याची लढाई, कोण बाजी मारणार?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें