Jalgaon : खडसेंसोबत मैत्री कायम, भाजप पक्ष प्रवेशाबद्दल काय म्हणाले रावसाहेब दानवे?

| Updated on: Sep 25, 2022 | 6:45 PM

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या नाथा भाऊंची पुन्हा घर वापसी होणार अशी चर्चा सुरु आहे. यावर केंद्रीय मंत्री यांनी दिलेले उत्तर महत्वाचे आहे. रोखठोक बोलणारे दानवे काय म्हणाले ते पाहू..

Jalgaon : खडसेंसोबत मैत्री कायम, भाजप पक्ष प्रवेशाबद्दल काय म्हणाले रावसाहेब दानवे?
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आ. एकनाथ खडसे
Follow us on

अनिल कराळे टीव्ही 9 प्रतिनिधी जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले एकनाख खडसे (Eknath Khadse) यांची घरवापसी होणार अशी चर्चा सुरु आहे. त्यांच्या एका फोनवरुन या चर्चेला उधाण आले होते. मात्र, ते भाजपात (BJP Party) प्रवेश करणार नाही असे भाजप पक्षानेच नव्हेतर खुद्द एकनाथ खडसे यांनी देखील सांगितले आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या केवळ अफवा असून त्यामध्ये तथ्य असे काहीच नाही. त्यांनी कुठल्या नेत्याची भेट घेतली नाही की त्याअनुषंगाने कुठे चर्चा झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाचा विषयच येत नसल्याचे दानवे म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्यावरुन या चर्चेला उधाण आले होते. खडसे यांनी अंतर्गत मतभेदामुळेच भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरु होती.

एकनाथ खडसे आणि रावसाहेब दानवे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. पण त्यांनी आता वेगळी वाट निवडली आहे. ते मित्र असले तरी वैचारिक मतभेद आहेत. शिवाय त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत काहीही नसताना हा विषय चर्चेत आलेला आहे.

आम्ही दोघे मित्र असलो तरी आता वाटा ह्या वेगळ्या झाल्या आहेत. त्यांच्या आणि माझ्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळेच त्यांनी वेगळी अशी वाट निवडली. आता त्यांचा आणि माझा मार्ग एकत्र येऊ शकणार नसल्याचेही दानवे म्हणाले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरच त्यांची विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी म्हणून वर्णी लागली आहे. असे असतानाच त्यांचा पुन्हा भाजपात प्रवेश होणार अशी चर्चा रंगू लागली होती.

मात्र, कुणाशी राजकीय संबंध असणे यामध्ये गैर काय असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. आजही मी केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करु शकतो, पण याचा अर्थ पक्ष प्रवेश असा होत नसल्याचे खडसे यांनी यापूर्वीच सांगितले आहे.