आधी फॉर्म्युला सांगितला, नंतर पलटी मारली; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यभरात आढावा बैठका सुरू आहेत. कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिले जात आहे. त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केलं आहे. फडणवीस यांनी हा फॉर्म्युला सांगितल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत.

आधी फॉर्म्युला सांगितला, नंतर पलटी मारली; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
devendra fadnavis Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 2:51 PM

अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 27 नोव्हेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 26 जागांवर तर शिंदे आणि अजितदादा गट 22 जागांवर लढणार होती. या फॉर्म्युल्याची बातमी आल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे फडणवीस यांनी लगेच पलटी मारली आहे. आता फडणवीस यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आमच्या चर्चा अजून व्हायच्या आहेत. फॉर्म्युला चर्चेनंतरच ठरेल. जो पक्ष ज्या सीट लढला आहे, त्या सीट त्याच्याकडे जाव्यात हा जागा वाटपाचा आधार असेल. पण जागा वाटपाचा हा आधार असला तरी याचा अर्थ ते स्टॅटिक आहे का? तर तसं नाही. त्यात आवश्यक ते बदलही आम्ही आपआपसात बसून करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

अवकाळीचा अहवाल मागितला

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेतय. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल पाठवण्याचा सूचना दिल्या आहेत. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा मदत करण्याचीच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत. पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी सरकार नक्कीच मदत करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

त्यावर बोलणं योग्य नाही

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या संदर्भात मी काहीच बोलू शकत नाही. त्या सुनावणीला ज्यूडिशियल आणि ट्रिब्यूनलचा दर्जा आहे. त्यावर कमेंट करणे योग्य होणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

प्रदूषण वाढतंय

आधुनिक डच तंत्रज्ञान आपल्याकडे आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर देशातील सस्टेनेबल शहर म्हणून नागपूरला पाहता येईल. आज सगळीकडे प्रदूषणाची समस्या आहे. इंडस्ट्रीमुळे प्रदूषण होते. मात्र त्यासोबत शहरात सुद्धा मोठं प्रदूषण निर्माण होतं. वातावरणातील बदलाला समोर जावे लागत आहे. कालचा आणि आजचा दिवस पावसाचा नव्हता. मात्र अवकाळीला समोर जावे लागत आहे. एकीकडे अवर्षण आहे तर दुसरीकडे अवकाळी आहे, असं त्यांनी सांगितलं.

शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी..
शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले....
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले...
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले....
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'.
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?.
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका.
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला.
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?.
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच...
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच....
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू.