Rohit Pawar : आरोप-प्रत्यारोपानंतर रोहित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भेटीमागचे कारण काय?

छत्रपती शिवराय आणि देशभराचील ऐतिहासिक गोष्टी ह्या भारताच्या बाहेर आहेत. त्या परत महाराष्ट्रामध्ये कशा आणता येतील यावर चर्चा झाली. शिवाय हा मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील महत्वाचा वाटल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. रोहित पवार हे कर्जत-जामखेड विभानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघातील विकास कामाबाबतही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Rohit Pawar : आरोप-प्रत्यारोपानंतर रोहित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भेटीमागचे कारण काय?
रोहित पवार, आमदारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 4:42 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे (Rohit Pawar) आमदार रोहीत पवार हे मतदारसंघातील कामानिमित्त आणि विविध योजना राबवण्याबाबत (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. यापूर्वीही त्यांनी अशा भेटी घेऊन मतदार संघातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. शिवाय या भेटीत त्यांनी परदेशात असलेल्या आपल्या राज्यातील (Historical structures) ऐतिहासिक वास्तू परत आणव्यात याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या भेटीमागे वेगळेच कारण असल्याचा सूर आता उमटू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजपाचे मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करणाऱ्या ट्विटची मालिकाच सुरु केली होते. यावर पवार यांनी स्पष्टीकरणही दिले. असे असताना त्यांनी लागलीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भेटीमागचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

छत्रपती शिवराय आणि देशभराचील ऐतिहासिक गोष्टी ह्या भारताच्या बाहेर आहेत. त्या परत महाराष्ट्रामध्ये कशा आणता येतील यावर चर्चा झाली. शिवाय हा मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील महत्वाचा वाटल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. रोहित पवार हे कर्जत-जामखेड विभानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघातील विकास कामाबाबतही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले आहे. अन्य कोणत्याही बाबींवर चर्चा झाली नाही, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

मोहित कंबोजचे काय आहेत आरोप?

ग्रीन एकर्स कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे 200 व्यवसाय उभारण्यात आले आहेत.या स्टार्टअप्ससाठी 2007 ते 2012 या कालावधीत घेण्यात आलेल्या कर्जातून बॅंकेचे 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. असे असतानाही या बॅंकेने एका गबरुला करोडो रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. त्यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता ट्विट केले होते. या पैशावर 50 कोटी रूपयांना कारखाना कार्टेल बनवत बारामती ॲग्रोने विकत घेतला आहे. तर याच कारखान्यावर पुन्हा 150 कोटींचे कर्ज घेतले गेल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. सबंध ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी गबरु जवान असाच उल्लेख केला आहे.

हे सुद्धा वाचा

संस्थाकडून ना चौकशी ना नोटीस

मोहित कंबोज यांच्याकडून करण्यात आलेले आरोपांमध्ये तथ्य नाही. तो केवळ प्रसिध्दीसाठी केलेला कारभार आहे. शिवाय आपल्याला कोणत्याही संस्थेची नोटीस आलेली नाही किंवा चौकशीलाही बोलावलेले नाही. भविष्यात चौकशीला बोलावणे आलेच तर त्यांना आपण सहकार्य करणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले होते. या स्पष्टीकरकणानंतर लागलीच आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.