एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून कोणतं मंत्रिपद मिळू शकतं?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून कोणतं मंत्रिपद मिळू शकतं?
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 1:04 PM

मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गेल्या चार दशकापासून उत्तर महाराष्ट्रात आणि राज्यात भाजपच्या विस्तारात खडसेंचा मोठा वाटा राहिला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी भाजपच्या वाढीमध्ये मोठं योगदान दिलं आहे. तेव्हा अशा मोठ्या नेत्याला पक्षात घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडसेंना काय मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (What will Eknath Khadse get in NCP? )

एकनाथ खडसे यांना कृषी, जलसंपदा किंवा गृहनिर्माण?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. दरम्यान, गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे. आव्हाड आणि पाटील हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. अशावेळी त्यांच्याकडून मोठ्या खात्याची जबाबदारी काढून ती भाजपमधून येणाऱ्या खडसेंना दिली जाणार का? असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे.

दरम्यान कृषी खातं हे शिवसेनेच्या दादाजी भूसे यांच्याकडे आहे. त्यामुळं शिवसेना आपल्या गोटातून कृषी सारखं जनतेशी जोडणारं खातं सोडणार का, हा मोठा प्रश्न आहे. यावर पर्याय म्हणून खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ठाकरे सरकारच्या खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत व्यक्त होत आहेत. कृषी खातं राष्ट्रवादीकडे घेऊन शिवसेनेला राष्ट्रवादीच्या गोटातील एखादं खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खडसेंसारख्या नेत्याची गरज

उत्तर महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकनाथ खडसे यांच्यासारख्या मोठ्या आणि आक्रमक नेतृत्वाची गरज आहे. एकनाथ खडसे भाजपमध्त्याये असताना राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात आपली मुळं मजबूत करण्यात अनेक अडचणी होत्या. पण आता खडसेंसारखाच नेता पक्षात येत असल्यानं राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडूनही आनंद व्यक्त केला जात आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंना मोठं खातं मिळणार, हे नक्की मानलं जात आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी राजकीय सीमोल्लंघनासाठी नवी वेळ निश्चित केली आहे. त्यानुसार एकनाथ खडसे (Eknath Khadse) येत्या शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ला सूत्रांनी दिली आहे. खडसे यांच्या गोटात त्यादृष्टीने हालचालाही सुरु झाल्या आहेत. त्यासाठी खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना?

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

What will Eknath Khadse get in NCP?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.