AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको, मुलगा की भुजबळ?, अजितदादा राज्यसभेवर कुणाला पाठवणार?; आज सस्पेन्स संपणार?

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्यात राज्यसभा निवडणुकीची चर्चा आहे. महायुतीने राज्यसभेची एक जागा अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला दिली आहे. उद्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. मात्र, राष्ट्रवादीने अजूनही राज्यसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. आज संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

बायको, मुलगा की भुजबळ?, अजितदादा राज्यसभेवर कुणाला पाठवणार?; आज सस्पेन्स संपणार?
parth pawarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2024 | 1:34 PM
Share

भाजपने अजितदादा गटाला राज्यसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजितदादा यांच्या गटाचं संसदेतील एकूण संख्याबळ तीन होणार आहेत. सुनील तटकरे हे लोकसभेत आहेत. तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेत आहेत. त्यात आता आणखी एका खासदाराची भर पडणार आहे. पण पक्षात कुणाला राज्यसभा द्यायची यावरून माथापच्ची सुरू आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभा देऊन त्यांचं पुनर्वसन करावं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर पार्थ यांना संधी द्यावी असं पक्षातील एका गटाचं म्हणणं आहे. तर आणखी एका गटाला छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवून पक्षाचा आवाज बुलंद करावा असं वाटतंय. त्यामुळे आता अजितदादा बायको, मुलगा की छगन भुजबळ? कुणाला राज्यसभेची संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण राज्यसभेची उमेदवारी भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आजच उमेदवाराच्या नावाची घोषणा करावी लागणार आहे. राष्ट्रवादीत राज्यसभेच्या नावाच्या स्पर्धेत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ आहेत. या तिघांपैकी एकाला राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अजितदादा या तिघांपैकी एकाला उमेदवारी देतात की अन्य कुणाला याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, या स्पर्धेत सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

सुनेत्रा पवारांसाठी आमदार सरसावले

दरम्यान, सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची शक्यता अधिक आहे. राज्यभरातील आमदारांनी अजित पवार यांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांनाच राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अजितदादा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काटेवाडीतील गावकरी एकवटले

सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर बारामतीच्या काठेवाडी गावातील ग्रामस्थ आणि सरपंच एकवटले होते. त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात मंत्री करावं, अशी मागणी या गावकऱ्यांनी केली होती. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामतीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला बळ मिळेल. कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल. चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पत राखण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर नियुक्ती झाली पाहिजे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

कार्यकारिणीचा ठराव

दोन दिवसांपूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत एक महत्त्वाचा ठराव करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देण्याचा ठराव करण्यात आल्याची माहिती पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.

Follow Us
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...