AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद? 5 नावे चर्चेत, सहाव्याची एन्ट्री; आज सुटणार पेच

पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे तिन्ही नेते अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. संघटनेवर त्यांची पकड आहे. त्यामुळे या पैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद? 5 नावे चर्चेत, सहाव्याची एन्ट्री; आज सुटणार पेच
sangram thopteImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2023 | 9:47 AM
Share

मुंबई | 17 जुलै 2023 : राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि राज्यातील राजकीय समीकरणात झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्याने शरद पवार यांचा गट अल्पमतात आला आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार आहेत. या पदासाठी काँग्रेसमधील पाच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचा विरोधी पक्षनेता आणि विधान परिषदेची विरोधी पक्षनेता असं सूत्र ठरलेलं आहे. त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आपसूकच काँग्रेसकडे जाणार आहे. काँग्रेसने नकार दिला तरच ते राष्ट्रवादीकडे राहू शकतं. मात्र, तसं होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करतील. अध्यक्ष कोणत्या नावाची विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करतात आणि काँग्रेसने कुणाच्या नावाची शिफारस केलीय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाच नावांची चर्चा

सध्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी पाच नावे चर्चेत आहेत. मात्र. या दावेदारीत सहाव्याचीही एन्ट्री झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातील दोघे माजी मुख्यमंत्री आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे दोन्ही माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेतेपदाच्या स्पर्धेत आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमदार विजय वडेट्टीवार हे तिन्ही नेते विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चेत आहेत. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांना पद दिल्यास पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष शोधावा लागणार आहेत. निवडणुका तोंडावर असल्याने पटोले यांना हटवण्याची रिस्क पक्ष नेतृत्व घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पटोले यांना विरोधी पक्षनेते पद मिळणं अशक्य आहे.

पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे तिन्ही नेते अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. संघटनेवर त्यांची पकड आहे. त्यामुळे या पैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विजय वडेट्टीवार हे आक्रमक नेते आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता आहे. तर काही सूत्रांच्या मते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची पक्षांवर पकड अधिक असल्याने हे पद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. आता प्रत्यक्षात हे पद कुणाकडे जाणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

संग्राम थोपटे चर्चेत

दरम्यान, संग्राम थोपटे यांचं नावही विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे. थोपटे यांनीही आपली दावेदारी सांगितली आहे. त्यामुळे या सहाव्या दावेदाराकडे हे पद जातं का? हे पाहावं लागणार आहे. थोपटे यांनी तर थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला आहे. मलाच विरोधी पक्षनेता करा, अशी मागणी त्यांनी खरगे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे खरगे कुणाकडे या पदाची जबाबदारी देतात हे पाहावं लागणार आहे.

Follow Us
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
Amit Thackeray | 'माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल' अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक... आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत
उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील!
Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क...
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली!