मुंबई महापालिकेने फक्त कचरा उचलायचा का? : महापौर

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई: महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना लिहिलेल्या खरमरीत पत्रानंतर, आयुक्त आणि महापौर यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. “मुंबईचा पहिला नागरिक म्हणून महापौरांना विश्वासात न घेता अनेक निर्णय प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर केले जातात. तसेच आयुक्त आणि प्रशासन आपल्याला जुमानत नाही. महापौरांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे”, असे […]

मुंबई महापालिकेने फक्त कचरा उचलायचा का? : महापौर
Follow us on

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई: महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना लिहिलेल्या खरमरीत पत्रानंतर, आयुक्त आणि महापौर यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. “मुंबईचा पहिला नागरिक म्हणून महापौरांना विश्वासात न घेता अनेक निर्णय प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर केले जातात. तसेच आयुक्त आणि प्रशासन आपल्याला जुमानत नाही. महापौरांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे”, असे आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्तांवर केले आहेत.

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी टीव्ही 9 मराठीसोबत बातचीत केली.

“प्रशासनाबरोबर कुठलाही वाद नाही, पण पालिकेची विविध विकासकामं, धोरणं यासंदर्भात अधिकाऱ्यांनी जाहीर घोषणा करु नये. यासंदर्भात मी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. आयुक्तांनी प्रत्येक खातेप्रमुखांना ही माहिती जाहीर करायला मज्जाव करावा”, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

याशिवाय महापौर म्हणाले, “कोणत्याही प्रकल्पाची माहिती जाहीर करण्याचं काम हे महापौरांचं आहे, असे राज्य सरकारच्या परिपत्रकात म्हटलं आहे. महापौरांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न होता कामा नये”

मुंबई महापालिका ही मुंबईकरांसाठी काम करते, त्यामुळे पालिकेने केलेल्या कामाची माहिती देण्याचा अधिकार महापौरांना आहे. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाराचं संवर्धन केलं पाहिजे. अनेक प्राधिकरण स्थापन करुन, मुंबई पालिकेचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप महापौर महाडेश्वर यांनी केला.

धारावीचा पुर्नविकास केला जात आहे, पण त्यात पालिकेला विश्वासात का घेतलं जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुंबई पालिकेने फक्त कचरा उचलण्याचं काम करायचं का? पालिकेला योग्य तो निधी का दिला जात नाही? असे अनेक प्रश्न यावेळी महापौरांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मांडले.