…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरुन ऐकण्यात आले, संजय राऊतांनी सांगितलं कारण!

...म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरुन ऐकण्यात आले, संजय राऊतांनी सांगितलं कारण!
संजय राऊत आणि नाना पटोले

आजच्या सामना अग्रलेखामधून राऊतांनी नानांचं मोठेपण सांगत तत्कालिन फडणवीस सरकारला नानांपासून धोका आहे, असं वाटलं असेल म्हणून त्यांचा फोन टॅप केला गेला असेल, असं म्हटलंय (Why should Nana Patole phone be tapped, Sanjay Raut Guess)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jul 14, 2021 | 7:08 AM

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, असं त्यांनी म्हटलं… कालच्या विधिमंडळ अधिवेशनात नानांनी पाळत ठेवल्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला… महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप झाले… त्यात नाना पटोले देखील होते. पण नानांचा फोन का टॅप झालेला असावा याचा अंदाज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लावला आहे. आजच्या सामना अग्रलेखामधून राऊतांनी नानांचं मोठेपण सांगत तत्कालिन फडणवीस सरकारला नानांपासून धोका आहे, असं वाटलं असेल म्हणून त्यांचा फोन टॅप केला गेला असेल, असं म्हटलंय

नानांचा फोन टॅपिंगचा आरोप, राऊत म्हणतात…

फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी लागली आहे. सरकार एखाद्याचे फोन ‘टॅप’ करीत असेल म्हणजे एक तर तो देशविघातक कारवायांत सहभागी असायला हवा, नाही तर त्या व्यक्तीपासून सरकारला धोका आहे, असे समजायला हवे. नाना दुसऱ्या प्रकारात मोडतात. नानांमुळे सरकार पडेल किंवा नवे सरकार येईल, असे पोलीस खात्यातील फडणवीसांच्या अंधभक्तांना तेव्हा वाटले असेल. त्यातून नानांचे फोन चोरून ऐकण्यात आले, असा अंदाज राऊतांनी लावला आहे.

नानांचा मंत्र ऐकण्यासाठी केंद्राकडून पाळत

महाराष्ट्रात नाना नामक विभूतीकडे काँग्रेसला संजीवनी देण्याचा मंत्र किंवा गुटिका प्राप्त झाली असून त्यामुळे काँग्रेस स्वबळावर सत्तेवर येऊ शकते, तर त्यांचे कान नक्कीच टवकारले गेले असतील. काँग्रेसच्या नानांना प्राप्त झालेला हा मंत्र किंवा विद्या काय आहे ते ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी नानांवर पाळत ठेवण्याचा प्रयोग केंद्राकडून सुरू आहे असेच दिसते.

सरकार अस्थिर करण्यासाठी महापूजा, त्यातला महाप्रसाद म्हणजे नानांचे फोन

नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकले जात आहेत तसे ते अनेकांचे ऐकले जात असावेत. महाराष्ट्रातले सरकार दिल्लीश्वरांच्या डोळ्यांत खुपत आहे. मनात सलते आहे. हे सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्राने जी महापूजा मांडली आहे त्यातला तीर्थप्रसाद म्हणजे नानासारख्यांचे फोन ऐकणे. त्यांच्यावर हेरगिरी करणे. नाना त्यामुळे जास्तच उसळून उठले. नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. नानांच्या रांगड्या बोलीचे महाराष्ट्राला कौतुक आहे.

नानांवर पाळत ठेवून सरकार पाडले जाईल या अंधभक्तीत कोणी राहू नये

अर्थात महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार या असल्या हसण्या, बोलण्याने, बागडण्याने ढिले पडणार नाही. ते काल मजबूत होते, आजही आहे आणि उद्यादेखील मजबूत राहील. नानांवर पाळत ठेवून सरकार पाडले जाईल या अंधभक्तीत कोणी राहू नये. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद तसे काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद होतेच. काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी नानांनीच त्या मोठ्या पदाचा त्याग केला हे कसे विसरता येईल? त्यागमूर्तीला त्यामुळेच सत्य वचनाचे तेज प्राप्त होते व नानांना असे तेज प्राप्त झाले आहे.

(Why should Nana Patole phone be tapped, Sanjay Raut Guess)

हे ही वाचा :

नाना रांगडे गडी, ते काय बोलतात आणि कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अवलंबून नाही : संजय राऊत

भाजपा बहुजन समाजविरोधी पक्ष, मुंडे, खडसेंचा वापर करुन डावलले : नाना पटोले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें