AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : अब्दुल सत्तारांना तुरुंगात डांबणार का? नितेश राणेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, 2017चा व्हिडीओ केला ट्विट

भाजप आमदार नितेश राणे यांनी एक जुना व्हिडीओ ट्विट करून मंत्री अब्दुल सत्तारांना पर्यायाने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलंय.

Video : अब्दुल सत्तारांना तुरुंगात डांबणार का? नितेश राणेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, 2017चा व्हिडीओ केला ट्विट
उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देणार? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार? सभेआधी नितेश राणेंचे 4 सवालImage Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 27, 2022 | 1:22 PM
Share

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यामधील द्वंद सर्वश्रृत आहे. त्यातही राणे कुटुंबिय आणि शिवसेनेमधील (shivasena) वार-पलटवार, आरोप प्रत्यारोप महाराष्ट्राला काही नवे नाहीत. यातच आता राज्यात हनुमान चालीसावरुन सुरु असलेल्या राजकारणात भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांनाच कारवाई करण्यासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. यानिमित्ताने हनुमान चालीसावरुन राज्यात सुरु असलेल्या राजकारणाला वेगवेगळं वळणं फुटतांना दिसतंय. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा जुना व्हिडीओ ट्विट करुन पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांना पर्यायाने शिवसेनेला डिवचलंय.

नितेश राणेंनी ट्विट केलेला व्हिडीओ

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

भाजप आमदार नितेश राणे यांनी जो व्हिडीओ ट्विट केला आहे. तो व्हिडीओ 2017चा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या दहिगाव शिवारात शेतजमिनीच्या वादातून दोन गटात हाणारी झाल्याचा प्रकार त्यावेळी घडला होता. त्यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्च भाषेत धार्मिक भावना दुखावतील अशी शिवीगाळ केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर त्यावेळी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यावेळी याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.

नितेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे यांनी या प्रकारावर बोलताना म्हटलंय की, व्हिडीओमध्ये प्रभू हनुमानाला शिव्या देणारा व्यक्ती शिवसेनेचे राज्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करू नये, आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, असे म्हणतात. मग ते अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करून त्यांचे हिंदुत्व सिद्ध करून दाखवतील का, असा सवाल राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे. दरम्यान, यावर  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘अब्दुल सत्तार हे गांभीर्याने घेण्यासारखे नाहीत. त्यांचे वक्तव्य विनोदासारखे असतात. मात्र, हुमानाबद्दल त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल तर हिंदु जनता त्याची दखल घेईल,’ असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणालेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?