Xiaomi 12 Pro : शाओमी 12 प्रो सोबत ‘हे’ प्रोडक्टही होणार लाँच… काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

शाओमी भारतात आपले दोन मोठे प्रोडक्ट लाँच करण्याच्या तयारी आहे. लाँच होण्याआधी त्याबद्दलची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

Xiaomi 12 Pro : शाओमी 12 प्रो सोबत ‘हे’ प्रोडक्टही होणार लाँच... काय आहेत स्पेसिफिकेशन्स?
Xiaomi 12 ProImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 11:49 AM

मुंबई : शाओमी (Xiaomi) कंपनी आज भारतात आपला एक इव्हेंट आयोजित करीत आहे. या कार्यक्रमामध्ये कंपनी आपले काही नवीन प्रोडक्ट भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. या इव्हेंटचे नाव शाओमी नेक्स्ट 2022 असे असून नावावरुन कंपनी काही तरी जोरदार धमाका करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. या इव्हेंटला युट्यूबवर लाईव्ह पाहता येणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी शाओमी 12 प्रो (Xiaomi 12 Pro) आणि शाओमी पॅड 5 (Xiaomi Pad 5) या दोन मोठ्या प्रोडक्टना लाँच करणार आहे. हा कार्यक्रम आज दुपारी 12 वाजेला म्हणजेच आता काही मिनिटांमध्ये सुरु होणार आहे. परंतु या पहिलेच आम्ही तुमच्यासाठी त्याचे काही खास फिचर्सबद्दलची माहिती घेउन आलो आहोत.

शाओमी 12 प्रोचे फिचर्स

एका रिपोर्टनुसार, या फोनमध्ये 6.73 इंचाचे क्यूएचडी प्लस एलटीपीओ 2.0 अमोलेड डिसप्ले मिळण्याची शक्यता आहे. सोबतच या डिसप्लेमध्ये 120hz चे रिफ्रेश रेट्स मिळतील. यामुळे गेमिंग आणि स्क्रोलिंगाचा अधिक चांगला एक्सपिरियंस मिळणार आहे. शाओमीचा हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन असणार आहे. स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटचा यात समावेश असणार आहे. सोबत यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी एंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यात अजून विविध व्हेरिएंट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यासर्व माहिती एका रिपोर्टवर आधारीत असून याबाबत कंपनीने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

कसा असेल कॅमेरा सेटअप

शाओमी 12 प्रोमध्ये बॅक पॅनलवर ट्रीपल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल असू शकतो. सेकंडरी कॅमेरादेखील 50 मेगापिक्सल असण्याची शक्यता आहे. कॅमेरामध्ये अल्ट्रा वाइड अँगल असेल. तिसरी लेंस 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस असेल. सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. दरम्यान, चार्जिंगबाबत विचार केल्यास यात 4600 एमएएचची बॅटरी मिळणार आहे. ही एक वायर चार्जिंग असणार आहे. या चार्जिगच्या माध्यमातून वापरकर्त्यांना 120 वॅट इतके फास्ट चार्जरदेखील मिळणार आहे. यात डिसप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि एनएफसी सपोर्टदेखील मिळणार आहे.

शाओमी पॅड 5 चे संभावित फिचर्स

शाओमी पॅड 5 लादेखील याच इव्हेंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. यात 11 इंचाची एलसीडी डिसप्ले देण्यात आला आहे. हा डिसप्ले 120hz चा असेल. या टॅबलेटमध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला असून सोबत 6 जीबी रॅमदेखील मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.