AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics : बंडखोर आमदारांच्या मुलांना युवासेनेच्या पदांवरून हटवण्यात येणार? आदित्य ठाकरे लवकरच निर्णय घेण्याची शक्यता

ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्या आमदारांच्या मुलांकडे असलेली युवासेनेची पदे काढून घेतली जावीत , अशी मगाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Maharashtra politics : बंडखोर आमदारांच्या मुलांना युवासेनेच्या पदांवरून हटवण्यात येणार? आदित्य ठाकरे लवकरच निर्णय घेण्याची शक्यता
आदित्य ठाकरेImage Credit source: TV9
| Updated on: Jun 25, 2022 | 2:32 PM
Share

मुंबई : राज्याच्या  राजकारणात गेल्या काही दिवसांपासून भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. शिवसेनेतील (ShivSena) आमदाराच्या एका मोठ्या गटाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेतील जवळपास 40 पेक्षा अधिक आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आता या घडामोडीदरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बंडखोर आमदारांच्या मुलांना जी युवासेनेची पदे देण्यात आली होती, त्या पदावरून त्यांना हटवण्यात येण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली, त्या आमदारांच्या मुलांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली  आहे. त्यांनी याबाबत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात काय म्हटले?

शिवसेनेचे जवळपास 40 पेक्षा अधिक आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले आहेत. या बंडखोर आमदारांच्या मुलांकडे युवासेनेचे विविध  पदे आहेत. आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. त्यामुळे त्यांच्या मुलांची पदे देखील काढून घ्यावीत अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील निवेदन आदित्य ठाकरे यांना देण्यात  आले आहे. दरम्यान याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदारांच्या मुलांना आपली पदं गमवावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे आधिक आक्रमक झाले असून, त्यांनी काल राज्यभरातील शिवसेना नगरसेवकांशी संवाद साधला आहे. आपल्याला शिवसेना पुन्हा एकदा उभी करायची आहे, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.

सरकारसमोरील अडचणी वाढल्या

एकनाथ शिंदे हे आता महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत आहेत. लवकरच त्याबाबत त्यांच्याकडून घोषणा केली जाऊ शकते. त्यांनी  38 आमदारांचा पाठिंबा असल्याचे एक पत्र देखील सादर केले आहे. तसेच त्यांनी  शिवसेना बाळासाहेब नावाच्या स्वतंत्र गटाची स्थापना देखील केली आहे. आता या गटाला मान्यता द्यायची की नाही याबाबत विधानसभा उपाध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. मान्यता मिळाल्यास शिवसेना आणखी अडचणीत सापडणार आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल