Yuzvendra Chahal joins BJP: त्याला स्वत:चा शुगर डॅडी सापडला; चहलने BJPमध्ये प्रवेश करताच टीकेची झोड, खासदार असं काही म्हणाल्या की सर्वजण चकीत

Yuzvendra Chahal joins BJP: शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी युझवेंद्र चहलवर उपरोधिक टीका केली आहे. त्यांनी चहलच्या खासगी आयुष्यावरून ही टीका केली आहे.

Yuzvendra Chahal joins BJP: त्याला स्वत:चा शुगर डॅडी सापडला; चहलने BJPमध्ये प्रवेश करताच टीकेची झोड, खासदार असं काही म्हणाल्या की सर्वजण चकीत
Priyanka chaturvedi and chahal
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 22, 2026 | 8:07 AM

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या खेळासोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. आता त्याने राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. तो भाजपमध्ये सामील झाला आहे. पक्षात सामील झाल्यानंतर भाजपच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘नॅशनल ओबीसी फ्रंट’च्या कार्यकारी समितीवर त्याची ‘विशेष निमंत्रित’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी क्रिकेटपटू युझवेंद्र चहलला टोला लगाला आहे. चतुर्वेदी यांनी ‘शुगर डॅडी’ हा शब्द वापरून त्याला उपहासात्मक टोला लगावला आहे.

चहलने BJPमध्ये प्रवेश करताच सोशल मीडिया पोस्टद्वारे अधिकृत घोषणा करण्यात आली. या पोस्टवर प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “असे वाटते की त्याला स्वतःचा शुगर डॅडी सापडला. IYKYK.” असे प्रियंका यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या टिप्पणीने लगेच सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी याला चहलच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि गेल्या काही वर्षांत त्यांच्याभोवती फिरणाऱ्या व्हायरल सोशल मीडिया चर्चेशी संबंध असल्याचे म्हटले आहे.

Loading...

नेमकं प्रकरण काय?

ही टिप्पणी चहलची पूर्वी पत्नी धनश्री वर्मा आणि त्याच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान उघड झालेल्या वादाशी संबंधित मीम्स, ऑनलाइन विनोदांकडे इशारा करणारी होती. चहलने घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना ‘Be your own sugar daddy’ असे लिहिलेले टीशर्ट घातले होते. त्याच्या या टी-शर्टनंतर ‘शुगर डॅडी’ हा वाक्प्रचार सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय बनला. चतुर्वेदी यांच्या टिप्पणीने मात्र ही चर्चा राजकीय दिशेने वळवली. चहलचा भाजपच्या संघटनात्मक रचनेत प्रवेश झाल्याच्या बातम्यानंतर लगेच ही टिप्पणी आली. त्यांनी हा वाक्प्रचार वापरून त्यांच्या राजकीय नियुक्तीला पूर्वीच्या वैयक्तिक आयुष्याभोवतीच्या व्हायरल विनोदांशी जोडण्याचा प्रयत्न केल्याचे अनेकांना वाटले.

युझवेंद्र चहलविषयी

चहल हा भारतातील प्रमुख लेग-स्पिनर म्हणून ओळखले जातो. आता तो क्रिकेटच्या पलीकडे जाऊन चर्चेत आला आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चातील त्याच्या नियुक्तीने लक्ष वेधले असून चतुर्वेदी यांच्या धारधार टिप्पणीने त्याच्या राजकारणातील प्रवेशाभोवतीच्या चर्चेत आणखी भर घातली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us