सरकार मुंबई लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत, तोच विचार पुणे-पिंपरीबाबत : अजित पवार

"कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार योग्य पावलं (Ajit Pawar on Pune transport) उचलत आहे.

सरकार मुंबई लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत, तोच विचार पुणे-पिंपरीबाबत : अजित पवार
Follow us
| Updated on: Mar 20, 2020 | 6:47 PM

Corona पुणे : “कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार योग्य पावलं (Ajit Pawar on Pune transport) उचलत आहे. मात्र नागरिकांनी गर्दी कमी करुन कोरोनाचा संसर्ग (Ajit Pawar on Pune transport) टाळायला हवा. मुंबईतील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे सरकार मुंबई लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत आहे. तोच विचार पुणे आणि पिंपरी चिंचवडबाबत आहे”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनावश्यक प्रवास टाळावा, जर अत्यंत गरज असेल तरच प्रवास करा, अन्यथा नाईलाजास्तव सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले. 

गर्दी राहिली तर नाईलाजास्तव बसेस बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे गर्दी कृपा करुन करु नका. मुंबईप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड मध्येही असा निर्णय घ्यावा लागले, असं अजित पवार म्हणाले.

कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आहे. राज्यातला बाधितांचा आकडा 52 वर गेला आहे. लोकांनी गर्दी टाळायला हवी. लग्न असो वा अंतिम विधी कोणत्याही कार्यक्रमांना गर्दी करु नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

सरकारने जे निर्णय घेतले आहेत, ते निर्णय पुढचे आदेश निघेपर्यंत कायम राहतील. मुंबई, पुणे, पिंपरी  आणि नागपुरातील अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व  दुकाने, कार्यालये बंद राहतील, असं अजित पवारांनी सांगितलं.

लग्नासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दी करु नये फक्त मोजकी लोकं जमावी. जर शक्य असेल तर लग्न पुढे ढकला. हे वेगळ्या प्रकारचे संकट आहे, गर्दी टाळायची आहे, त्याची सुरुवात स्वतः पासून करायची आहे, लग्न असो की कोणतंही कार्य, दहावं-तेरावं कार्य असलं तरी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा.लग्न, अंत्यविधी, दशक्रिया विधीतील गर्दी टाळा, असं  आवाहन अजित पवारांनी केलं.

होमगार्ड पुरवणार

पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी होमगार्ड लागणार आहेत ते देण्याचा निर्णय घेतला आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

व्यापारी उद्योजकांना आवाहन आहे की अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. सर्वांनी शक्यतो घरामध्ये थांबून काम करावं. प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा, घाबरुन जाऊ नये, ही सामूहिक जबाबदारी आहे. पुढचे 15 दिवस महत्त्वाचे आहेत, असं अजित पवारांनी नमूद केलं.

मी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही निधीची कमतरता भासू नये. काही निर्णय 31 मार्च 2020 पर्यंत झालेले होते. पुढचे आदेश निघेपर्यंत या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी चालू राहील. 10 आणि 12 वी परीक्षा सोडून सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दहाव्या-तेराव्याची गर्दी टाळा

पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातही दु:खद निधन झाल्यानंतर गर्दी केली जाते. माझी सर्वांना आवाहन आहे की, गर्दी टाळा. लग्न पुढे ढकला. अगदीच जरुरी असेल तर 25 जणांच्या उपस्थितीत लग्न पार पाडा. ग्रामीण भागात घरापुढे मंडप टाकला जातो आणि लग्न पार पडतं. तिथेही गर्दी कमी केली पाहिजे. दहावे आणि तेराव्यालाही गर्दी करु नये. मर्यादित लोकांमध्ये विधी पार पाडावं.

डॉक्टरांना विश्रांती द्यायला हवी

होमगार्ड्स लागतील तर ते देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचारी सतत काम करत आहेत. त्यांना ब्रेक मिळालाच नाही. त्यांना एखाद दिवस ब्रेक मिळावा यासाठी प्रयत्न करतोय. डॉक्टरांच्या जागी डॉक्टरच लागतील. मात्र, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

पोलिसांबाबतही तसंच करणार आहोत. त्यासाठी होमगार्ड्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील सर्व नागरिक, व्यापारी उद्योजकांना आवाहन करतो सरकारने दिलेल्या सुचनांचं काटेकोरपणे पालन करा. शक्यतो लोकांनी आपल्या घरीच थांबांवं.

घाबरुन नका. कोणत्याही प्रकारचं संकट येतं त्यावेळी त्या संकटाचा मुकबला सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा असतो. ही एक सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही या गोष्टी गांभीर्याने घ्यावे.

पुढचे टप्पे फार महत्त्वाचे आहेत. काहीजण उपचारादरम्यान त्यातून बाहेर पडले आहेत. जनता कर्फ्यूला पाठिंबा द्यावा.

रेशनवर तीन महिन्यांचं धान्य

रेशनवर तीन महिन्यांचं स्वस्त धान्य देतोय. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पूर्णतः निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंधरा दिवस महत्वाचे आहेत. ग्रामीण रुग्णालयात सगळ्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीला, नगरपरिषदेला निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिलेत. कोरोनाच्या संदर्भात ज्या गोष्टी लागतील त्या खरेदी करण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असं अजित पवार म्हणाले.

पळून जाऊ नका

अनेकजण हातावर शिक्के असूनही पळून जात आहेत. मात्र पळून जाऊ नका. आजार बरा होतो, डॉक्टरांचं ऐका. आरोग्य मंत्री चांगलं काम करत आहेत, जे चांगलं काम करतायेत त्यांना चांगलं म्हटलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.