प्रविण गायकवाड पुन्हा शर्यतीत, काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार

पुणे: संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस नेते मलिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनात प्रविण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. प्रविण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होत असला, तरी त्यांना पुण्याची उमेदवारी मिळणार का हा सर्वात उत्सुकतेचा प्रश्न आहे. प्रविण गायकवाड यांचे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून पुण्याची लोकसभा उमेदवारी मिळवण्यासाठी […]

प्रविण गायकवाड पुन्हा शर्यतीत, काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

पुणे: संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस नेते मलिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनात प्रविण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. प्रविण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होत असला, तरी त्यांना पुण्याची उमेदवारी मिळणार का हा सर्वात उत्सुकतेचा प्रश्न आहे. प्रविण गायकवाड यांचे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून पुण्याची लोकसभा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तरीही अजून काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाला वेळ आहे, मात्र माझ्यासाठी नाही, अशी खंत प्रविण गायकवाडांनी व्यक्त केली होती. शिवाय काँग्रेसच्या तिकीटाच्या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली होती. मात्र आज ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे पुन्हा ते तिकीटाच्या शर्यतीत दाखल झाले.

गिरीश बापटांविरुद्ध काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी?

दरम्यान भाजपने पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार हे पाहणं औत्स्तुक्याचं आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून प्रविण गायकवाड यांंचं नाव पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून चर्चेत होतं. पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांचे नाव स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सूचवलं होतं. मात्र, प्रविण गायकवाड यांच्या नावावर  शिक्कामोर्तब होऊ शकला नाही. काँग्रेसकडूनच इतर नावं पुण्याच्या जागेसाठी चर्चेत आल्याने प्रविण गायकवाड यांचं नाव मागे पडलं.

वाचा- बापटांविरोधात पुण्यात काँग्रेसकडून ‘ही’ पाच नावं चर्चेत!  

प्रविण गायकवाड यांच्या नावाला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला. बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी नको, अशी मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता.

एकीकडे पुण्यात भाजपने काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस उगवला, तरी काँग्रेसचा उमेदवारच जाहीर झालेला नाही. त्यामुळे गिरीश बापट यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता अद्याप कायम आहे.

अरविंद शिंदे यांचं नाव चर्चेत

दरम्यान, पुण्यात काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांचं नाव चर्चेत आहे. अरविंद शिंदे हे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक असून, काँग्रेसचे महापालिका गटनेते आहेत. पुण्यातील त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अरविंद शिंदे यांचे नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पुढे आले आहे. मात्र, त्यांच्याही नावावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. मात्र, अरविंद शिंदे हे काँग्रेसकडून प्रबळ दावेदार असल्याची माहिती आहे.

भाजपकडून उमेदवारीसाठी राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनीही जोर लावला होता. दरम्यान, काही काळ बंडाचे नाट्य झाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे नाट्य गुंडाळले. काँग्रेसबाबत परिस्थिती काहीशी वेगळी दिसत असून पुण्यातून कुणाला उमेदवारी द्यायची हाच पेच काँग्रेसला सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुण्यातील लोकसभा लढाई तुल्यबळ उमेदवारांमध्ये होणार की एकतर्फी हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पुणे काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट

येत्या 11 एप्रिलपासून  पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघातून उमेदवारांनी अर्ज भरण्यात सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेसला पुणे मतदारसंघासाठी उमेदवारच मिळत नसल्याने पुण्याच्या काँग्रेस भवन परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. येत्या 23 एप्रिल रोजी पुण्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसकडून या मतदारसंघासाठी उमेदवारच जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

काँग्रेसकडे उर्मिलासाठी वेळ, माझ्यासाठी नाही, प्रविण गायकवाडांची माघार  

सुरेखा पुणेकर 3 दिवसांपासून दिल्लीत, काँग्रेसकडून लावणी सम्राज्ञीला पुण्याचं तिकीट? 

पुणे काँग्रेस भवनात शुकशुकाट, उमेदवार जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी  

बापटांविरोधात पुण्यात काँग्रेसकडून ‘ही’ पाच नावं चर्चेत!   

युती आणि आघाडी, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार लढणार?   

उदयनराजेंचा पराभव निश्चित, सुप्रिया सुळे लाखाने हरतील : संजय काकडे  

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.