तीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची ‘कोरोना’वर मात

पुण्यातील सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कुटुंबातील 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा 'कोरोना'मुळे मृत्यू झाला होता (Pune Family of 15 members is now Corona Free)

तीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची 'कोरोना'वर मात
Follow us
| Updated on: Apr 22, 2020 | 7:44 AM

पुणे : पुण्यातील एकाच कुटुंबातले 15 रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाले आहेत. तीन वर्षांच्या बाळापासून 92 वर्षांच्या आजीपर्यंत सर्वांनीच ‘कोरोना’वर मात केली. (Pune Family of 15 members is now Corona Free)

संबंधित कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर संपूर्ण कुटुंबाची ‘कोरोना’ तपासणी केली असता, एक-दोघं नाही, तर तब्बल 15 कुटुंबियांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

पुण्यातील लवळेमधील सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये या कुटुंबावर उपचार सुरु होते, अखेर सर्व 15 जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला. 15 जणांमध्ये तीन वर्षांचे बाळ, 92 वर्षीय आजी आणि व्हीलचेअरवरील 60 वर्षीय पोलिओग्रस्त महिलेचाही समावेश आहे.

हेही वाचा : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘मदत आणि प्रेमाचा गुणाकार’, पुण्यात इंजिनिअर-डॉक्टर तरुणांकडून ‘रिलीफ पुणे’ मोहिम

दरम्यान, पुण्यात काल कोरोनाचे 57 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 813 वर गेला आहे. कालच्या दिवसात पुण्यात कोरोनाबाधित तीन रुग्णांना प्राण गमवावे लागले.

पुण्यात पुढील दोन दिवसांसाठी दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. किराणा आणि भाजीपाला पूर्णपणे बंद राहणार असून केवळ दूधविक्री सुरु राहणार आहे, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी असे आदेश दिले आहेत. (Pune Family of 15 members is now Corona Free)

काय आहेत निर्बंध?

पुण्यात दोन दिवस म्हणजे 22 आणि 23 एप्रिल रोजी अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या दोन दिवसात जीवनावश्यक वस्तू म्हणजेच किराणा माल, भाजीपाला, फळे, चिकन, मटन, अंडी, ई-कॉमर्स यांची विक्री केंद्र, दुकाने, वितरण सेवा पूर्ण बंद राहील. तर दूध विक्री केंद्र सकाळी दोन तास म्हणजे 10 ते 12 या दरम्यान सुरु राहतील. दुधाच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र घरपोच दूध वितरण आणि दुकानातून होणाऱ्या दूध विक्रीवर वेळेचे बंधन राहील.

कोणत्या भागात निर्बंध? : इथे सविस्तर वाचा

(Pune Family of 15 members is now Corona Free)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.