मिथुन राशीत शक्तिशाली असा राजभंग योग तयार, तीन राशींचं नशिब 5 फेब्रुवारीपर्यंत फळफळणार!

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीमुळे बरेच शुभ अशुभ योग तयार होत असतात. त्यामुळे ग्रहाची स्थिती बदलली की त्याची युती, राशी आणि दृष्टी याचा विचार केला जातो. सध्या मिथुन राशीत अशीच काहीशी स्थिती आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे.

मिथुन राशीत शक्तिशाली असा राजभंग योग तयार, तीन राशींचं नशिब 5 फेब्रुवारीपर्यंत फळफळणार!
ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे मिथुन राशीत प्रभावी राजभंग योग, तीन राशींना 5 फेब्रुवारीपर्यंत मिळणार लाभ
| Updated on: Jan 05, 2024 | 4:57 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्राचं सर्व गणित ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. कोणता ग्रह कोणत्या राशीत आणि स्थानात विराजमान आहे. यावरून आकलन केलं जातं. प्रत्येक ज्योतिषाचा अभ्यास काहीतरी वेगळं सांगत असतो. त्यामुळे बऱ्याचदा अंदाचही चुकतात. पण एकपेक्षा जास्त वेळा तसाच अनुभव आला की एक चौकट तयार होते. सध्या गोचर कुंडलीनुसार मंगळ ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. मंगळाच्या गोचरामुळे राशीचक्रात बरीच उलथापालथ झाल्याचं दिसून येत आहे. शनिची दृष्टीक्षेपातून मंगळ दूर गेल्याने राशीचक्रावर सकारात्मक प्रभाव पडत आहे. दुसरीकडे मंगळ ग्रह धनु राशीत असला तरी मिथुन राशीच्या सातव्या स्थानात आहे. या स्थानावर शनि आणि राहुची नववी दृष्टी पडत आहे. त्यामुळे राजभंग राजयोग तयार झाला आहे. राजभंग राजयोगामुळे राशीचक्रातील काही राशींना फायदा होणार आहे. खासकरून तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत मंगळ ग्रह धनु राशीत असणार आहे. त्यानंतर मकर राशीत प्रवेश करताच हा योग संपुष्टात येईल.

या तीन राशींना मिळणार लाभ

मिथुन : या राशीत राजभंग राजयोग तयार होत असल्याने सकारात्मक परिणाम दिसतील. पतीपत्नीमधील वाद संपुष्टात येतील. तसेच ग्रहांच्या उत्तम स्थितीमुळे कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली अडकला असाल तर त्यातून तुमची सुटका होऊ शकते. कायदेशीर प्रकरणातही तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाच्या ठिकाणी बदल घडलेले दिसून येतील. काल परवापर्यंत आपला तिरस्कार करणाऱ्या बॉसच्या स्वभावात बदल दिसून येईल.

सिंह : ग्रहांच्या या स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. घरातील नैराश्याचं वातावरण संपुष्टात येईल. भावाबहिणीकडून चांगली साथ मिळेल. भावकीचा वादही संपुष्टात येण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होईल. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून असलेलं नैराश्य दूर होईल. आत्मविश्वास दुणावलेला राहील.

कर्क : ग्रहांची सकारात्मक प्रभाव बऱ्याच चांगल्या घडामोडी घडवून जाईल. न होणारी कामंही पूर्ण होतील. त्यामुळे जीव भांड्यात पडेल. एखाद्या गोष्टीची भीती मनातून कायमस्वरूपी निघून जाईल. या कालावधीत एखादा छोटा व्यवसाय वगैरे सुरु करू शकता. विदेशात जाण्यासाठी धडपड करणाऱ्या जातकांना मार्ग सापडेल. मनासारखा जॉब मिळण्यासाठी ग्रहांची उत्तम स्थिती आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)