होळीनंतर पापग्रह राहु-केतुमुळे तयार होतोय अभद्र योग, या राशींचं टेन्शन वाढणार

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करत असतो. त्याचा प्रभाव राशीचक्रावर पडतो. खासकरून पापग्रह जेव्हा राशी बदल करतात तेव्हा अधिक प्रभाव असतो. होळीनंतर पापग्रह राहु आणि केतु नक्षत्र बदल करणार आहेत. त्याचा प्रभाव खासकरून तीन राशींवर नकारात्मक पडणार आहे.

होळीनंतर पापग्रह राहु-केतुमुळे तयार होतोय अभद्र योग, या राशींचं टेन्शन वाढणार
| Updated on: Mar 02, 2025 | 5:14 PM

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गणित मांडून भाकीत वर्तवलं जातं. कोणता ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे. इथपासून काय फळं देणार याचा अंदाज बांधला जातो. गोचर कुंडलीत ग्रह एक ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करत असतात. होळी पौर्णिमा यंदा 14 मार्चला साजरी केली जाणार आहे. होळीच्या दोन दिवसांनी राहु आणि केतु नक्षत्र बदल करणार आहेत. 16 मार्चला राहुल पूर्वा भाद्रपदा आणि केतु उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींना त्रास सहन करावा लागणार आहे. या कालावधीत आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे या गोचर कालावधीत संयमाने काही पावलं उचलली तर फायद्याची ठरू शकतात. चला जाणून घेऊयात कोणत्या तीन राशींना फटका बसणार ते..

या तीन राशींचं टेन्शन वाढणार

मेष : या राशीच्या जातकांना राहु आणि केतुचं नक्षत्र परिवर्तन भारी पडू शकते. या कालावधीत उद्योगधंद्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या कालावधीत सावधपणे पावलं उचललेली बरं राहील. रागावर नियंत्रण ठेवलं बऱ्याच समस्या सौम्य होऊ शकतात. नवीन काम सुरु करण्यापूर्वी काळजी घेणं गरजेचं आहे.

कन्या : या राशीच्या जातकांवरही राहु केतुच्या नक्षत्र परिवर्तनाचा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना सर्वाधिक फटका बसू शकतो. प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मनासारखं होणार नाही. वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळाला तर बरं होईल.

मीन : या राशीच्या आयुष्यातही राहु केतुच्या नक्षत्र परिवर्तनाने उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. या कालावधीत उधारीने पैसे देणं टाळलं पाहीजे. उद्योगधंदा धीम्या गतीने पुढे जाईल. तुम्हाला हवा तसा सन्मान मिळणार नाही. त्यामुळे अस्वस्थ व्हाल. पण मानसिक संतुलन बिघडणार नाही याची काळजी घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)