AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro 2023 : 30 वर्षानंतर होळीला शनि-गुरुचा अद्भुत योग, चार राशींना मिळणार पाठबळ

होळी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. या दिवशी केलेल्या उपायांमुळे काही समस्या दूर होतात. त्यात ग्रहांचं पाठबळ असल्यास फायदा होतो.

Astro 2023 : 30 वर्षानंतर होळीला शनि-गुरुचा अद्भुत योग, चार राशींना मिळणार पाठबळ
30 वर्षानंतर होळीला पुन्हा एकदा तीच स्थिती, काय सांगतं ग्रहमान वाचा
| Updated on: Feb 28, 2023 | 8:48 PM
Share

मुंबई : फाल्गुन महिना सुरु झाला असून पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पौर्णिमा 6 मार्च असणार आहे. त्यामुळे हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार खास असणार आहे. कारण 30 वर्षानंतर शनिदेव आपल्या स्वराशीत विराजमान झाले आहेत. तर 12 वर्षानंतर गुरु ग्रह आपली स्वरास असलेल्या मीन राशीत आहेत. या व्यतिरिक्त कुंभ राशीता त्रिग्रही योग तयार होत आहे. कुंभ राशीत शनि, सूर्य आणि बुध एकत्रित त्रिग्रही योग तयार करत आहे. जवळपास 30 वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती तयार झाली आहे. यामुळे काही राशींना ग्रहांचं पाठबळ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या चार कोणत्या आहेत.

वृषभ – या राशीच्या जातकांना होळीच्या दिवशी तयार होणार ग्रहांचा योग फलदायी ठरणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना यावेळी फायदा दर्शवत आहे. तसेच नवीन करार या काळात निश्चित होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. तसेच मानसन्मानात वाढ होईल. असं असलं तरी एखादा निर्णय विचारपूर्वक घ्या.

मिथुन – या राशीच्या जातकांनाही ग्रहांचं पाठबळ मिळेल. ज्या कामात हात घालाल त्यात अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. तसेच विदेशात नोकरी करणाऱ्या संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमचं आर्थिक गणित सुधारेल. तसेच जुनी देणी तुम्हाला या काळात मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – ग्रहांच्या अनोख्या युतीमुळे वाहन आणि घर खरेदीचं सुख दर्शवत आहे. या काळात तुमचं एखादं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. उद्योग धंदा करणाऱ्या जातकांना या काळात इच्छित लाभ होईल. तसेच नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीसाठी ग्रहांची साथ मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातून चांगला धनलाभ दर्शवतो. या काळात आरोग्यविषय समस्या जाणवतील त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्या.

कुंभ – या रासीत सूर्य, शनि आणि बुध त्रिग्रही योग तयार करत आहेत. या दुर्लभ योगामुळे शुभ परिणाम दिसून येतील. कुंभ राशीला साडेसातीचा मधला टप्पा सुरु आहे. असं असूनही या काळात आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल. तसेच कुटुंबाकडून साथ मिळणार असल्याने कामात यश मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.