AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 वर्षानंतर सूर्याच्या स्थितीमुळे राशीचक्रात मोठी उलथापालथ, या कालावधीत कोणाला झुकतं माप? जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती काही ना काही घडामोड घडवत असते. त्यामुळे एखादा ग्रह चांगली, तर दुसरा ग्रह विपरीत फळं देत असतो. सध्या सूर्यदेवांनी मकर राशीत प्रवेश केला असून इतर ग्रहांची स्थिती काही राशींना अनुकूल आहे. चला जाणून घेऊयात राशीचक्रातील कोणत्या राशींना लाभ मिळणार ते

50 वर्षानंतर सूर्याच्या स्थितीमुळे राशीचक्रात मोठी उलथापालथ, या कालावधीत कोणाला झुकतं माप? जाणून घ्या
50 वर्षानंतर सूर्याच्या गोचरासह ग्रहांच्या स्थितीत बदल, या राशीच्या जातकांसोबत घडणार असं काही
| Updated on: Jan 22, 2024 | 6:14 PM
Share

मुंबई : पंचांगानुसार, 14 जानेवारीला सूर्यदेवांनी शनिच्या मकर राशीत प्रवेश केला आहे. या संक्रमणाला संक्रांती असं संबोधलं जातं. त्याचबरोबर मंगळ आणि गुरु परस्पर विरोधी राशींमध्ये विराजमान आहे. गुरु ग्रह मंगळाच्या मेष राशीत, तर मंगळ ग्रह गुरुच्या धनु राशीत विराजमान आहे. सूर्याच्या मकर राशीतील प्रभावामुळे सूर्याचा प्रभाव मेष राशीवर आला आहे. त्या मंगळ राशीत शुक्र, मंगळ आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 50 वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती जुळून आली आहे. त्यामुळे काही राशींना फटका, तर काही राशींना फायदा होणार आहे. या कालावधीत ग्रहांची स्थिती तीन राशींना अनुकूल असणार आहे. आर्थिक कोंडी फोडण्यास यामुळे मदत होऊ शकते. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना अपेक्षित फळ मिळणार ते सविस्तर..

या तीन राशींना मिळणार ग्रहांची साथ

मेष : या राशीच्या करिअर स्थानात सूर्यदेव विराजमान आहे. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ भाग्य स्थानात आहे. तर गुरु याच राशीत ठाण मांडून आहे. आत्मसन्मान असलेला हा ग्रह गतवैभव मिळवून देऊ शकतो. काही दिवसांपासून झालेल्या गच्छतींनंतर पुन्हा एकदा चांगले दिवस येतील. पगारवाढ किंवा पदोन्नती होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठांचा असलेला राग निवळेल.

कर्क : या राशीच्या सप्तम स्थानात सूर्य, मेष राशीतील गुरुची पंचम दृष्टी पैशांच्या स्थानावर आहे. त्यामुळे या स्थितीचा फायदा जातकांना होईल. करिअरमध्ये नवी उंची गाठाल. गेल्या काही दिवसांपासून अतृप्त अशा इच्छा पूर्ण होतील. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात.

तूळ : या राशीच्या जातकांनाही ग्रहांच्या स्थितीचा फायदा होईल. गोचर कुंडलीत सूर्यदेवांचा प्रभाव वैवाहिक जीवनावर राहील. तसेच नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. विदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्या जातकांना एखादी ऑफर मिळू शकते. तसेच देशविदेशात व्यवसायाचं जाळं पसरवू शकता. जमिनीचे वाद संपुष्टात येतील. नवीन जागा खरेदी करू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित