AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aquarius/Pisces Rashifal Today 09 July 2021 | चांगली बातमी मिळेल, स्वार्थी लोकांपासून अंतर ठेवा

कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य

Aquarius/Pisces Rashifal Today 09 July 2021 | चांगली बातमी मिळेल, स्वार्थी लोकांपासून अंतर ठेवा
Aquarius_Pisces
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 12:29 AM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : आज शुक्रवार 9 जुलै 2021 (Aquarius/Pisces Rashifal). हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aquarius/Pisces Daily Horoscope Of 09 July 2021 Kumbha And Meen Rashifal Today) –

कुंभ राश‍ी (Aquarius), 09 जुलै

घरात कोणत्याही शुभ कार्याची योजना तयार केली जाईल. ज्यामुळे तेथे आनंदी वातावरण असेल. प्रत्येक कार्य पूर्ण परिश्रमपूर्वक आणि नियोजित पद्धतीने करण्याचा प्रयत्न कराल. यामध्ये आपल्याला योग्य यश देखील मिळेल. कोणतीही चांगली बातमी मोबाईल किंवा ईमेलद्वारे मिळू शकते.

जास्त खर्च केल्यामुळे परिस्थिती विचित्र होऊ शकते. सुज्ञपणे वागणे महत्वाचे आहे. राजकीय किंवा कोर्टाच्या खटल्याशी संबंधित एखादे प्रकरण सुरु असल्यास आपण त्या संदर्भात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

आज व्यवसायात भरपूर काम असेल. आपल्या कार्यपद्धतीत केलेले बदल सकारात्मक परिणाम देतील. जनसंपर्क आपल्यासाठी आर्थिक स्वरुपात फायद्याचे ठरतील. कार्यालयात झालेल्या चुकांमुळे अधिकाऱ्यांकडून तुम्हाला ऐकावं लागू शकते.

लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण आनंदाने आणि शांततेने भरलेले असेल. विवाहबाह्य संबंध आपल्यासाठी समस्या निर्माण करु शकतात. म्हणून सावध रहा.

खबरदारी – रक्तदाब संबंधित समस्या वाढू शकतात. त्यामुळे तणावाला तुमच्यावर अधिराज्य गाजवू देऊ नका. विश्रांतीही घ्या.

लकी रंग – केशरी लकी अक्षर- स फ्रेंडली नंबर- 7

मीन राश‍ी (Pisces), 09 जुलै

आता भूतकाळाच्या काही उणिवा जाणून घेण्याची आणि पुढे जाण्याची वेळ आली आहे. जवळच्या लोकांशी संबंधातही विस्मयकारक सुधारणा होईल. यावेळी ग्रह संक्रमण आपल्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करीत आहे. रखडलेल्या कामांना वेगही मिळेल.

पण स्वार्थी लोकांपासून अंतर ठेवा. त्यांचा चुकीचा सल्ला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो. कोणत्याही अपरिचित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन केल्यावरच त्यांच्याशी नातं जोडा.

व्यवसाय वाढविण्यासाठी भागीदारी सर्वोत्तम सिद्ध होईल. घरातील वरिष्ठ सदस्य तुमचे सर्वोत्तम मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरतील. नोकरीमध्ये इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे, तसेच पदोन्नती देखील शक्य आहे.

लव्ह फोकस – वैवाहिक जीवन सुखद आणि शांत राहील. प्रेम संबंधातही जवळीक वाढेल.

खबरदारी – घश्याशी संबंधित कोणतीही समस्या गंभीरपणे घ्या. निष्काळजीपणाने वागू नका आणि त्वरीत उपचार घ्या.

लकी रंग – आकाशी लकी अक्षर- रा फ्रेंडली नंबर- 3

Aquarius/Pisces Daily Horoscope Of 09 July 2021 Kumbha And Meen Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्तींना आनंदी राहणे वाटते सोपे, नेहमी राहतात सकारात्मक

Zodiac Signs | आपल्या व्यक्तींसाठी जीव द्यायलाही घाबरत नाहीत या राशीच्या व्यक्ती, अत्यंत प्रामाणिकपणे नाते निभावतात

Follow Us
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...