Astro Tips: या सोप्या उपायांनी होते मान-सन्मानात वृध्दी, ग्रहांचा राजा सूर्याचा मिळतो आशीर्वाद

जर सूर्य अशुभ फळ देणार असेल तर खूप मेहनत आणि समर्पण करूनही तुम्हाला अशुभ फळच मिळेल. लोकं तुमची निंदा करतील. ते टाळण्यासाठी हे उपाय करा.

Astro Tips: या सोप्या उपायांनी होते मान-सन्मानात वृध्दी, ग्रहांचा राजा सूर्याचा मिळतो आशीर्वाद
ज्योतिषीय उपाय
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 04, 2023 | 8:47 AM

मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार (Astro Tips for Sun) सूर्य हा कीर्ती आणि सन्मान देणारा ग्रह आहे. जर तुमचा मान कमी होत असेल, कष्ट करूनही तुम्हाला प्रसिद्धी मिळत नसेल, तर याचा अर्थ सूर्य तुमच्या विरोधात आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी, कुटुंबात आणि समाजात प्रसिद्धी आणि सन्मान वाढवायचा असेल तर तुम्ही रोज सूर्याची पूजा करावी. जर सूर्य अशुभ फळ देणार असेल तर खूप मेहनत आणि समर्पण करूनही तुम्हाला अशुभ फळच मिळेल. लोकं तुमची निंदा करतील. ते टाळण्यासाठी हे उपाय करा.

हे उपाय फायदेशीर ठरतील

  1.  सूर्यासाठी रविवारी उपवास ठेवा.
  2. रविवारी मीठ टाळावे.
  3. कमीत कमी 11 रविवार फक्त दही आणि भाताचे सेवन करा.
  4. रविवारी वाहत्या पाण्यात तांब्याचे नाणे वाहावे.
  5. जेव्हा सूर्य अशुभ असतो तेव्हा व्यक्तीने तांब्याचे नाणे सोबत ठेवावे.
  6. रविवारी गायीला गूळ खाऊ घालावा.
  7. 21 रविवारी श्री गणेशाला लाल फूल अर्पण करा.

सर्वप्रथम दैनंदिन कामातून निवृत्त झाल्यावर स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे. सूर्याला जल अर्पण करताना गायत्री मंत्र किंवा सूर्यमंत्राचा जप करावा.

– ओम भास्कराय नम:

– ओम सूर्याय नम:

-ओम आदित्यय नम:

-ओम दिवाकराय नम:

 

मान सन्वामान वाढवण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे, खिशामध्ये मोरपंख ठेवावा. मोरपंख पिवळ्या कपड्यात बांधून ठेवणे जास्त शुभ राहील. भगवान श्रीकृष्णही डोक्यावर मोरपंख लावतात. याच कारणामुळे मोरपंखाचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.

रोज सकाळी लवकर उठावे आणि मेडिटेशन करावे. आकर्षण वाढवण्यासाठी मेडिटेशन करताना पूर्ण लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये लाल बिंदीवर (टिकली) लावावे आणि बिंदीकडे बघण्याचा प्रयत्न करावा. खुप दिवस हा उपाय केल्यास आकर्षण शक्ती वाढू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)