AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology 2023 : चार दिवसानंतर बुध ग्रह करणार गोचर, चार राशींच्या जातकांना मिळणार पाठबळ

नवग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह गोचर करणार आहे. या गोचरामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण चार राशीच्या जातकांना विशेष लाभ होईल.

Astrology 2023 : चार दिवसानंतर बुध ग्रह करणार गोचर,  चार राशींच्या जातकांना मिळणार पाठबळ
बुध ग्रहाच्या गोचरासोबत चार राशींचं नशीब चमकणार, कोणत्या राशी आहेत वाचा
| Updated on: Jul 03, 2023 | 10:29 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचरामुळे बऱ्याच घडामोडी घडत आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि इतर क्षेत्रावर परिणाम दिसून येत आहे. आता मंगळ आणि शुक्र ग्रहानंतर आता बुध ग्रहही गोचर करणार आहे. बुध ग्रहाला नवग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. बुध हा ग्रह बुद्धी आणि ज्ञानाचा ग्रह आहे. कुंडलीत बुध ग्रह बलवान असेल तर विचार शक्ती चांगली असते. त्यामुळे राशीचक्रावर सकारात्मक आणि नकारात्मक बदल दिसून येणार आहे. 8 जुलै 2023 रोजी बुध ग्रह गोचर आहे. बुध ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या गोचरामुळे चार राशीच्या जातकांना जबर फायदा होणार आहे.

या राशीच्या जातकांना होईल फायदा

मेष : ही राशीचक्रातील पहिली रास असून या राशीच्या चौथ्या स्थानात बुध गोचर करणार आहे. या राशीच्या जातकांना गोचर शुभदायी असणार आहे. बुधाच्या पाठबळामुळे मेष राशीच्या जातकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. या काळात लव्ह लाईफ आणि वैयक्तिक आयुष्यात चांगले बदल दिसून येतील.

कन्या : या राशीच्या एकादश भावात बुध ग्रह गोचर करणार आहे. या राशीच्या जातकांना पैसे कमवण्याच्या संधी चालून येतील. सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच करिअरमध्ये उंची गाठण्याची संधी मिळेल. विदेशात जॉबची संधी चालून येईल. तसेच काम करत असलेल्या ठिकाणी पगारवाढ होऊ शकते. आरोग्यही चांगलं राहील. आत्मविश्वास दुणावल्याने कामही झटप़ होतील.

तूळ : बुध ग्रहाच्या गोचरामुळे जीवनात बरेच सकारात्मक बदल दिसून येतील. नवीन जॉब स्वीच करू शकता. पगारवाढ तसेच पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आयात निर्यात व्यवसाय असलेल्या जातकांना फायदा होईल. नवीन ओळखी होतील आणि त्याचा भविष्यात उपयोग होईल. शत्रूपक्षाला तुमच्या प्रगतीमुळे त्रागा होईल. तुमच्यावर गुप्तपणे प्रहार करण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरेल.

मीन : या राशीच्या जातकांना बुध गोचराचा चांगला फायदा होईल. आत्मविश्वास दुणावलेला राहील. घरातील वातावरणही चांगलं राहील. कौटुंबिक वाद शमल्याने शांतता राहील. घरात शुभ कार्य पार पडेल. शेअर बाजार आणि गुंतवणुकीतून फायदा होईल. काही शेअर पैसा कमवून देतील. पण योग्य वेळी विकण्याचं धाडस करणं गरजेचं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?