AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology 2023 : सेनापती मंगळ आणि राक्षस गुरु शुक्राची होणार युती, तीन राशींवर राहील चांगला प्रभाव

Astrology Mangal Shukra Yuti : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहांची स्थिती काळानुसार बदलत असते. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होते. आता एप्रिल महिन्यात मोठे बदल झाल्यानंतर आता मे महिन्यात मंगळ आणि शुक्राची युती पाहायला मिळणार आहे.

Astrology 2023 : सेनापती मंगळ आणि राक्षस गुरु शुक्राची होणार युती, तीन राशींवर राहील चांगला प्रभाव
मंगळ आणि शुक्राच्या युतीमुळे तीन राशींना मिळणार लाभ, कधीपर्यंत असेल अशी स्थिती जाणून घ्या
| Updated on: Apr 26, 2023 | 4:03 PM
Share

मुंबई : एप्रिल महिन्यात देवगुरु बृहस्पतीने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला आहे. या राशीत बृहस्पती वर्षभरासाठी राहणार आहे. त्यानंतर आता इतर ग्रहांच्या हालचाली सुरु होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात धनदाता आणि राक्षसांचा गुरु असलेला शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 2 मे 2023 रोजी दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी हे गोचर होणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि या गोचरामुळे शुभ फळ मिळू शकतात. या राशीत या आधीच मंगळ ग्रह ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे मंगळ आणि शुक्राची युती पाहायला मिळणार आहे.

मंगळ आणि शुक्राची युती मिथुन राशीत 8 दिवस राहील. मंगळ ग्रह 10 मे रोजी दुपारी 1 वाजून 44 मिनिटांनी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत 1 जुलै 2023 पर्यंत मध्यरात्री 1 वाजून 52 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर 30 मे रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल.

मंगळ ग्रहाला आत्मविश्वास आणि साहसाचं प्रतिनिधित्व मानलं गेलं आहे. तर शुक्र ग्रहाला आत्मसन्मान, धनवैभव यांचा कारक मानलं गेलं आहे. चला जाणून घेऊयात या युतीचा कोणत्या राशींना फायदा होईल ते…

या राशींना मिळू शकतो फायदा

मेष : शुक्र आणि मंगळ या राशीच्या तिसऱ्या स्थानात गोचर करणार आहे. त्यामुळे जातकांना कौटुंबिक आनंद अनुभवता येईल. मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल. भावंडांमध्ये तुम्हाला प्रेम दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळेल.

वृषभ : मंगळ आणि शुक्राची युती या राशीच्या दुसऱ्या म्हणजेच धनस्थानात होत आहे. यामुळे जातकांना सुख, समृद्धी, धनसंपदा आणि आनंदाची अनुभूती मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. पदोन्नती किंवा पगारवाढ या काळात होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात तुम्हाला तणाव दिसून येईल.

कन्या : या राशीच्या दशम भावात मंगळ आणि शुक्राची युती होणार आहे. त्यामुळे जातकांना नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. केलेल्या कामाचं अपेक्षित फळ मिळाल्याने आनंद द्विगुणित होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?