AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology 2023 : सिंह राशीत दोन दिवसांसाठी त्रिग्रही योग, शुभ स्थितीमुळे तीन राशींची होणार झटपट कामं

ग्रहांची स्थितीवर बरंच काही घडामोडी घडत असतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. सध्या सिंह राशीत तीन ग्रहांची युती झाली आहे. त्यामुळे तीन राशींना लाभ मिळणार आहे.

Astrology 2023 : सिंह राशीत दोन दिवसांसाठी त्रिग्रही योग, शुभ स्थितीमुळे तीन राशींची होणार झटपट कामं
Astrology 2023 : शुक्रासोब चंद्र आणि मंगळाची युती, त्रिग्रही योगाचा दोन दिवस तीन राशींना मिळणार लाभ
| Updated on: Jul 20, 2023 | 2:26 PM
Share

मुंबई : ग्रहांचा गोचर कालावधी हा वेगवेगळा आहे. त्यामुळे कमी अधिक कालावधीमुळे एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत येतात. त्यात चंद्र हा वेगाने भ्रमण करणारा ग्रह असल्याने दर सव्वा दोन दिवसांनी युती आघाड्या होत असतात. काही शुभ तर काही अशुभ युती होतात. त्या त्या स्थितीनुसार राशीचक्रावर परिणाम होत असतो. आता चंद्र हा सिंह राशीत आला आहे. या राशीत मंगळ आणि शुक्र आधीच ठाण मांडून आहेत. त्यामुळे त्रिग्रही योग जुळून आला आहे. या त्रिग्रही योगाचा तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. सव्वा दोन दिवस कसे असतील ते जाणून घेऊयात.

ग्रहांची स्थिती कशी असेल?

20 जुलै 2023 सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत आला आहे. मंगळ ग्रहासोबत युतीमुळे लक्ष्मी योग, तर शुक्रासोबत युतीमुळे कलात्मक योग तयार झाला आहे. त्रिग्रही युती 22 जुलैला संपुष्टात येईल. कारण या दिवशी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत रात्री 11 वाजून 42 मिनिटांनी प्रवेश करेल.

या तीन राशीच्या जातकांना मिळेल लाभ

मेष : त्रिग्रही योगामुळे या राशीच्या जातकांना तीन ग्रहांचं बळ मिळणार आहे. लक्ष्मी योग आणि कलात्मक योगामुळे या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होणार आहे. तसेच प्रगतीची नवी दारं खुली होतील. कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. तसेच त्यासाठी योग्य मोबदला देखील हाती पडेल. पण असं असताना लग्न भावात गुरु आणि राहुच्या युतीमुळे चांडाळ योग तयार झाला आहे विसरू नका. त्यामुळे बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. वाद होईल असं वागू नका.

मिथुन : या राशीच्या जातकांना त्रिग्रही योगाचा लाभ मिळणार आहे. या राशीच्या एकादश भावात तीन ग्रह एकत्र आले आहेत. त्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. जमीन किंवा घर खरेदीचा योग जुळून येईल. तसेच न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. दुसरीकडे, मोठी आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या. दिवाळखोरीत जाल असं काही करू नका.

सिंह : या राशीच्या लग्नभावात चंद्र, मंगळ आणि शुक्राची युती होत आहे. यामुळे या राशीच्या जातकांच्या स्वभावात अचानक बदल झालेला दिसेल. आपल्या शब्दांना योग्य मान मिळतोय असं जाणवेल. तसेच आपली कामं झटपट होताना दिसतील. आपण बोलावं आणि पटकन काम व्हावं अशी स्थिती आहे. दुसरीकडे, इतरांची कामं पूर्ण करून देताना त्याची शहनिशा करून घ्या. उगाचच एखादी प्रकरण अंगलट येऊ शकतं.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी