AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology 2025 : 7 डिसेंबरपासून मंगळ ग्रहाची वक्री चाल, अडीच महिन्यांचा कालावधी या राशींना फलदायी

ज्योतिषशास्त्रानुसार, 7 डिसेंबरपासून मंगळ ग्रहाची स्थिती बदलणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम राशीचक्रावर होणार आहे. काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळं भोगावी लागतील. पण तीन राशींना या स्थितीचा लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या लकी राशींबाबत

Astrology 2025 : 7 डिसेंबरपासून मंगळ ग्रहाची वक्री चाल, अडीच महिन्यांचा कालावधी या राशींना फलदायी
| Updated on: Dec 05, 2024 | 4:00 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती एका ठराविक कालावधीनंतर बदलत असते. आता मंगळ ग्रह आपली स्थिती बदलण्याच्या तयारीत आहे. मंगळ ग्रहाला शौर्य आणि पराक्रमाचा कारक मानलं जातं. त्यामुळे त्याच्या स्थितीत बदल झाला की राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. व्यक्तीच्या कुंडलीतील मंगळ ग्रहाची स्थिती चांगली असेल तर करिअर, बिझनेस आणि आर्थिक स्थितीत सकारात्मक परिणाम दिसून येतो. हाच मंगळ ग्रह 7 डिसेंबरला वक्री चाल चालणार आहे. द्रिक पंचांगानुसार, 7 डिसेंबरला सकाळी 5 वाजून 1 मिनिटांनी मंगळ ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहे. ही स्थिती 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे नव वर्षातही मंगळ ग्रहाची काही राशींना साथ मिळणार आहे. खासकरून तीन राशींचं या स्थितीमुळे भलं होणार आहे. चला जाणून घेऊयात या लकी राशीबाबत…

कर्क : या राशीतच मंगळ ग्रह वक्री होणार आहे. म्हणजेच लग्न स्थानात मंगळ वक्री होईल. त्यामुळे या राशीच्या जातकांचा आत्मविश्वास दुणावलेला राहील. समाजात एक वेगळी ओळख निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अडचणींवर या काळात मात कराल. कौटुंबिक पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

कन्या : या राशीच्या जातकांना मंगळ ग्रहाची उत्तम साथ मिळेल. कारण उत्पन्नाच्या स्थानात मंगळ ग्रहाची वक्री स्थिती असणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. तसेच काम करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा असेल. त्यामुळे कामं झटपट पूर्ण होतील. वैवाहिक जीवनातील कलह दूर होतील.

मकर : या राशीच्या जातकांना मंगळ ग्रह शुभ फळं देणार आहे. नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच करिअरमध्ये नव्या संधी चालून येतील. उद्योगधंदा करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. प्रवासातून लाभ दर्शवत आहे. काही अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होतील. आरोग्य विषयक तक्रारीही दूर होतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क.
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद.