AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती राहणार उत्तम

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती राहहणार उत्तम.

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती राहणार उत्तम
आजचे राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 14, 2022 | 7:58 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष-  जुने प्रश्न मार्गी लावाल. मुलांच्या बाबत चिंता सातवेल. कार्यालयीन ठिकाणी वादात पडू नका. दिवसभर धावपळ करावी लागेल. गरजूंना मदत केल्याचा आनंद मिळेल.
  2. वृषभ- कुटुंबासोबत दिवस आनंदात जाईल. बोलण्यातून लोकांना प्रभावित कराल. वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक बाजू बळकट होईल. कामातील अडचणी दूर करू शकाल.
  3. मिथुन- जोडीदाराकडून लाभ होईल. आवडती वस्तु बरेच दिवसांनी सापडेल. आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. व्यापारात नवीन भागीदार सापडेल. अनेक जबाबदार्‍या पार पाडाल.
  4. कर्क-  विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. कृतीत सामंजस्य  आणावे. त्यामुळे मार्ग सहज सापडेल. कुटुंबासाठी खर्च कराल.
  5. सिंह- मित्रांकडून अनपेक्षित लाभ संभवतात. सर्व गोष्टीतून आनंद शोधाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. सहकार्‍यांशी वादात पडू नका. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
  6. कन्या- कामातील बदल लक्षात घ्या. घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका. सहकारी वर्गाची मदत घ्याल. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. आर्थिक स्थिती चांगली राहील.
  7. तूळ- कामानिमित्त छोटे प्रवास होतील. कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. मान,सन्मान वाढीस लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. विरोधक पराभूत होतील.
  8. वृश्चिक- आरोग्याची वेळच्यावेळी काळजी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. तुमचा उद्देश साध्य होईल. सारासार विचार करून घेतलेला निर्णय योग्य ठरेल.
  9. धनू- भागीदारी व्यवसायाचे लाभ मिळतील. कामात सहकारी स्वखुशीने मदत करतील. द्विधा मन:स्थितीतील निर्णय पुढे ढकला. वैचारिक दिशा बदलून पहा. भावंडांची मदत घ्याल.
  10. मकर- नवीन नोकरीसाठी बोलावणे येईल. घरात वादग्रस्त प्रसंग टाळा. मेहनतीला पर्याय नाही. कामात झालेले नुकसान भरून काढाल. नवीन योजना आखताना सावधानता बाळगा.
  11. कुंभ- विद्यार्थ्यांना उत्तम काळ. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडाल. नातेसंबंध दृढ होतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
  12. मीन- घरासंबंधी कामे मार्गी लावा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. फटकून बोलू नका. घरातील वातावरण खेळकर राहील. ज्ञान वाढीस लागेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल