AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: कन्या राशीत जुळून येतोय बुधादित्य योग, 16 ऑक्टोबरपर्यंत चमकणार या राशींचे भाग्य

बुधादित्य योगामुळे चार राशींच्या जातकांना फायदा होणार आहे. या चार भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.

Astrology: कन्या राशीत जुळून येतोय बुधादित्य योग, 16 ऑक्टोबरपर्यंत चमकणार या राशींचे भाग्य
बुधादित्य योग
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 27, 2022 | 9:12 PM
Share

मुंबई,  17 सप्टेंबर रोजी सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे बुधादित्य योग (Budhaditya Yog) जुळून येत आहे. बुध आधीच कन्या (Virgo) राशीत होता. हा शुभ योग 16 ऑक्टोबरपर्यंत राहील. ज्योतिषशास्त्रात (Astrology) बुधादित्य योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात साधकाला संपत्ती, मान-सन्मान मिळतो. बुधादित्य योगामुळे  4 राशींना नशिबाची विशेष साथ मिळेल. त्यांची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.

  1. मेष- गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे.  ठरवलेल्या गोष्टी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवन आनंदाने भरलेले राहील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. प्रेम संबंधांच्या बाबतीत वेळ चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी उच्चपदस्थ लोकांचे सहकार्य मिळेल.
  2. मिथुन- कामाबद्दल आत्मविश्वास चांगला राहील. ऑफिसमध्ये परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मन रमेल. वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.
  3.  

    कर्क- व्यवसायात लाभ होईल. नवीन नोकरीच्या ऑफर प्राप्त होतील. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या शुभ मुहूर्ताचा फायदा घ्या. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील.दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. त्याचाही फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पती-पत्नीमध्ये सामंजस्य चांगले राहील.

    सिंह- प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. नोकरीत प्रमोशन अडकले असेल तर या योगात ते मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सहकाऱ्यांशी संबंध मधुर होतील. दिलेले पैसे परत केले जातील. व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळेल. आरोग्य सामान्य राहील. सुख-सुविधा वाढतील. वैवाहिक जीवन मधुर होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन