AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: दैनिक राशी भविष्य- या राशीच्या लोकांना मिळेल कामात यश

दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो.

Astrology: दैनिक राशी भविष्य- या राशीच्या लोकांना मिळेल कामात यश
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 09, 2022 | 7:41 AM
Share

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. दिवस अतिशय खास बनविण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, मन प्रसन्न होईल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही नवीन काम सापडेल.
  2. वृषभ- मंगल कार्यांसाठी शुक्रवार शुभ असेल. तुमचं मन प्रसन्न होईल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे.
  3. मिथुन- शिक्षण घेण्याऱ्यांसाठी शुक्रवार चांगला दिवस आहे. परिश्रमानुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. कुटुंबाचं प्रेम आणि सहकार्य मिळेल.
  4.  कर्क- तुमचा दिवस चांगला सुरू होणार आहे. तुम्हाला व्यवसायात देखील फायदा होणार आहे. याशिवाय नोकरीत पदोन्नती मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल, एकमेकांशी चांगला वेळ घालवाल.
  5. सिंह- तुमचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात फायदा होईल. नोकरीची परिस्थिती देखील चांगली राहील. तुम्हाला हवं तसं कामाचं फळ तुम्हाला मिळेल. कार्यक्षेत्रात आज पैशाची प्राप्ती होईल. मित्र, कुटुंबातील सदस्य आणि सहकारी तुम्हाला मदत करतील.
  6. कन्या- आज आरोग्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे.
  7. तूळ- हुशारीचा वापर करून काम केलं तर त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.
  8. वृश्चिक- नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊ देऊ नका.
  9. धनु- शुक्रवार  तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. तुम्ही स्तुतीस पात्र ठरेल. भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल.
  10. मकर- आज तुमच्या नेतृत्त्वंक्षमतेची परीक्षा आहे. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे आभार माना.
  11. कुंभ- तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मंगल कार्यात तुम्ही भाग घ्याल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जाईल. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहकार्य मिळेल.
  12. मीन- कुटुंबाकडून आज सुख मिळेल. मंगल कार्य किंवा समारंभात सामील व्हाल. एखाद्या विशेष व्यक्तीशी भेटणं आठवणीत राहील. कामासाठी दिवस चांगला आहे, नवीन उत्साह आणि उत्साह मनामध्ये दिसेल. प्रेम संबंधात यश मिळेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?