AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या राशीच्या लोकांची रखडलेली कामं होणार पूर्ण, कामात मिळणार यश

दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे

Astrology: या राशीच्या लोकांची रखडलेली कामं होणार पूर्ण, कामात मिळणार यश
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 20, 2022 | 5:30 AM
Share

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. तुमच्या मेहनतीतून अपेक्षित यश मिळू शकतं. आर्थिक काही समस्या असतील, तर त्याही दूर होतील. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात.
  2. वृषभ- कोणतंही काम करण्यासाठी घाई करू नका. प्रयत्नांना फळ मिळेल. ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांची कामगिरी चांगली असेल. पैशाच्या आगमनाने तुम्हाला आनंद मिळेल. जास्तीत जास्त उत्पन्नाचा प्रयत्न कराल आणि यशस्वी होईल.
  3. मिथुन-आजचा दिवस तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असू शकतो. कमी प्रयत्नाने तुम्हाला अधिक नफा मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित मित्राच्या मदतीने तुम्ही प्रगती करू शकता. आज तुमचा बॉस तुम्हाला प्रोत्साहित करेल.
  4. कर्क- आज आरोग्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे.
  5. सिंह- सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.
  6. कन्या- व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्याच निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. आज कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल.
  7. तूळ- नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. आज आपल्या लोकांसोबत वेळ घालवा. एखाद्या ठिकाणी भटकंतीचा योग आहे.
  8. वृश्चिक- आजच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरु करू नका. तुमच्या भाषेवर संयम ठेवा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. आरोग्याची आज काळजी घ्या.
  9. धनू- आजच्या दिवशी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. तसंच कठीण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायिकांनी कामात सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. योग्य माहिती न घेता कोणत्याच ठिकाणी गुंतवणूक करणं टाळा.
  10. मकर- आजच्या दिवशी तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. कामात यश मिळण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाणार आहे.
  11. कुंभ- प्रवासासाठी आजचा दिवस फार अनुकूल आहे. व्यवसायातील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. रुग्णांना फळं दान करा.
  12. मीन- या राशीच्या व्यक्तींना नोकरीत मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचं सहकार्य मिळू शकतं. गाडी चालवताना नियंत्रण ठेवा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती