AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

आजचे राशी भविष्य. अचानक धनलाभ झाल्याने या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

Astrology: आजचे राशी भविष्य,  'या' राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ
आजचे राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 21, 2022 | 7:51 AM
Share

मुंबई,  ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस उत्तम असणार आहे. व्यवसायातील कामात सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे जाणे हिताचे ठरेल. कोणताही वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांचा दिवस घरातील कामांमध्ये व्यतीत होईल.
  2. वृषभ- तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. स्वतःचे घर खरेदी करण्याची योजना आखू शकता. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या तुमच्या कामगिरीवरून अनेकजण प्रभावित होतील. मेहनतीने अगदी कठीण कार्ये देखील सहजपणे पूर्ण केली जातील.
  3. मिथुन- तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षांप्रमाणे सर्वकाही होईल. मनाला शांती मिळेल.उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल.
  4. कर्क- तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवू शकता. नशिबाच्या मदतीने  मोठे यश मिळवू शकता. आर्थिक यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. पर्यटनस्थळी  भेट देण्याची योजना करू शकता.
  5. सिंह-  संपूर्ण दिवस मजेत जाईल. व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न कराल. नातेवाईकांसोबत संबंध सुधारतील. तुमच्या मालमत्तेविषयी कोणतीही माहिती गोपनीय दुसऱ्यांना सांगू नका.  नोकरीबाबत निष्काळजीपणा करू नका.
  6. कन्या- तुम्हाला तुमची विचारसरणी आणि वागणं संतुलित ठेवणे आवश्यक आहे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
  7. तुला-  कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. लोह आणि धातूचा व्यवसाय करणार्‍यांसाठी फलदायी दिवस आहे. उधार-उसने देणे टाळा. आपण आपल्या दैनंदिन कामात काही बदल करू शकता.
  8. वृश्चिक-  जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल.आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असेल. कौटुंबिक कलह होणार नाही याची काळजी घ्या. आपलं उत्पन्न वाढू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
  9. धनु- अंथरून पाहून पाय पसरा. कार्यालयीन कामामुळे मनस्ताप होऊ शकतो. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना आपल्या मनात येतील.
  10. मकर- वडीलधाऱ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळेल. इतरांच्या पुढे जाण्याची इच्छा आज तीव्र होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुभव महत्वाचा असतो, पुन्हा होणाऱ्या चुका टाळा. आपल्या जोडीदाराबरोबर तुमचा काळ चांगला जाईल.
  11. कुंभ- तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रकरण निकाली लागेल. उत्साहाने व्यवसायासंबंधी योजना पूर्ण कराल. कोणत्याही नवीन बदलासाठी स्वत:ला तयार करा.
  12. मीन- आजचा दिवस धकाधकीचा असेल. घरातून निघताना गोड खाऊन निघाल्यास सगळी काम होतील. घाऊक विक्रेत्यांसाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टी किंवा पैशांच्या व्यवहाराबाबत काळजी घ्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.