AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या राशींचे लोकं कायमच पाळतात दिलेली वेळ; आपल्या कामाशी असतात एकनिष्ठ

टाइम इज मनी (Time is Money) अशी इंग्रजी म्हण प्रचलीत आहे. वेळ हा पैशांइतकाच महत्वाचा आहे. बऱ्याचदा आपण असे लोकं पाहतो जे वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असतात. इतरांना दिलेली वेळ तर ते पळतातच शिवाय इतरांनीसुद्धा वेळ पाळावी असा त्यांचा आग्रह असतो. जोतिष्यशास्त्रात (Astrology) अशा काही राशी सांगितल्या आहेत ज्या वेळेच्या आणि कामाच्या बाबतीत एकनिष्ठ असतात. […]

Astrology: या राशींचे लोकं कायमच पाळतात दिलेली वेळ; आपल्या कामाशी असतात एकनिष्ठ
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 11, 2022 | 5:38 PM
Share

टाइम इज मनी (Time is Money) अशी इंग्रजी म्हण प्रचलीत आहे. वेळ हा पैशांइतकाच महत्वाचा आहे. बऱ्याचदा आपण असे लोकं पाहतो जे वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असतात. इतरांना दिलेली वेळ तर ते पळतातच शिवाय इतरांनीसुद्धा वेळ पाळावी असा त्यांचा आग्रह असतो. जोतिष्यशास्त्रात (Astrology) अशा काही राशी सांगितल्या आहेत ज्या वेळेच्या आणि कामाच्या बाबतीत एकनिष्ठ असतात. आज आपण अशा चार राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या मते वेळ हा पैशांइतकाच महत्वाचा आहे. वेळेचे बंधन बाळंत असल्याने या राशीचे लोकं कधीकधी कडक स्वभावाचे म्हणूनसुद्धा ओळखले जातात. आळशी लोकांना यांचा राग येत असला तरी हेच लोकं आयुष्यात पुढे जातात.

  1. मेष- या राशीचे लोक अत्यंत वक्तशीर मानले जातात. त्यांना उशीर अजिबात आवडत नाही. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती निष्काळजीपणा करत असेल तर त्यांना लगेच राग येतो. तसेच, या लोकांना त्यांच्या मोकळ्या वेळेतही सक्रिय राहणे आवडते. हे लोक दिवसभर अंथरुणावर पडून किंवा त्यांचा आवडता कार्यक्रम पाहण्याऐवजी व्यायामशाळेत जातात किंवा काही प्रकारचे शारीरिक व्यायाम करतात. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे, त्याच्याकडून त्यांना हे गुण मिळतात.
  2. मिथुन- या राशीचे लोक अत्यंत वक्तशीर म्हणून ओळखले जातात. हे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी कामाचा निपटारा आधीच करतात. तसेच त्यांच्याशी कोणी निष्काळजीपणाने वागले तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. मिथुन राशीच्या लोकांना त्यांचा मोकळा वेळ नवीन गोष्टी करण्यात घालवायला आवडते. हे लोक जिज्ञासू असतात आणि काही तरी नवीन शिकून त्यांचा मोकळा वेळ घालवण्यावर विश्वास ठेवतात. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये हे गुण येतात.
  3. कुंभ- या राशीचे लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात. प्रत्येक गोष्ट वेळेवर पूर्ण करण्यावर हे लोक विश्वास ठेवतात. तसेच, हे लोक वेळेचे व्यवस्थापन चांगले करतात. या लोकांना त्यांच्या फावल्या वेळेत वेगवेगळी कामे करायला आवडते आणि ते कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असतात. कुंभ राशीवर शनिदेवाचे अधिराज्य आहे, शनिकडूनच त्यांना हे गुण मिळतात. कुंभ राशीच्या लोकांना मोकळा वेळ मिळेल तेव्हा समाजासाठी कोणत्याही प्रकारे योगदान देणे त्यांना आवडते. त्यामुळे ते सामाजिक उपक्रमात सहभागी होतात.
  4. वृश्चिक- या राशीचे लोक साहसी आणि धोका पत्करणारे असतात. ते त्यांचा मोकळा वेळ जवळपासची ठिकाणे शोधण्यात आणि नवीन गोष्टी करून पाहण्यात घालवतात. तसेच हे लोक खूप वक्तशीर असतात. त्यांना निष्काळजीपणा अजिबात आवडत नाही. ते वेळेचा सदुपयोग करतात. गुरू हा धनु राशीचा स्वामी आहे, त्याच्याकडून हे गुण त्यांना मिळतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच