AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : या चार राशीच्या मुली असतात सर्वात विश्वासू जोडीदार, कधीच देत नाही दगा

काही जण त्यांच्या नात्याबद्दल गंभीर असतात, तर काहींसाठी हा फक्त टाईमपास असतो. मुलींबद्दल सांगायचे झाल्यास त्या त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल किती गंभीर आहेत, याचे उत्तर ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळू शकते.

Astrology : या चार राशीच्या मुली असतात सर्वात विश्वासू जोडीदार, कधीच देत नाही दगा
जोतिषशास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 04, 2023 | 8:55 PM
Share

मुंबई : तरूण वयात एकमेकांसोबत जीवन जगण्याच्या आणा भाका घेतल्यानंतरही  किती लोकांचे प्रेमसंबंध लग्नापर्यंत पोहोचतात, हा या आधुनिकतेच्या युगात मोठा प्रश्नच आहे. काही जण त्यांच्या नात्याबद्दल गंभीर असतात, तर काहींसाठी हा फक्त टाईमपास असतो. मुलींबद्दल सांगायचे झाल्यास त्या त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल किती गंभीर आहेत, याचे उत्तर ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळू शकते. 4 राशीच्या मुलींना ज्योतिषशास्त्रात सर्वात विश्वासू जीवनसाथी मानले जाते. चला जाणून घेऊया या कोणत्या 4 राशी आहेत.

या राशीच्या मुली असतात सर्वाधीक विश्वासू

कर्क

कर्क राशीच्या मुली त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये खूप निष्ठावान असतात. ज्यांच्याशी त्या नातं जपतात, त्यांच्याशी ते आयुष्यभर प्रामाणिकपणे निभवतात. या राशीच्या मुलींशी लग्न करून तुम्हाला खूप सुरक्षित वाटेल. या राशीच्या मुली आपल्या लाइफ पार्टनरशी कधीही खोटे बोलत नाहीत.

मकर

मकर राशीच्या स्त्रिया त्यांच्या सर्व संबंधांमध्ये खूप निष्ठावान असतात. या राशीच्या मुली ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्याशी लग्न करण्यावर विश्वास ठेवतात. या राशीच्या मुलींना जीवनसाथी म्हणून निवडताना तुम्हाला अजिबात संकोच करण्याची गरज नाही. त्यांच्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की ते फार मागणी करत नाहीत आणि त्यांच्या अनावश्यक इच्छा जोडीदारावर लादत नाहीत. या राशीच्या मुलींसोबत आयुष्य जगणे खूप सोपे असते.

मीन

मीन राशीच्या मुलींबद्दल ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की त्या खूप काळजीवाहू आणि संवेदनशील असतात आणि त्यांचे त्यांच्या जोडीदारासोबतचे नाते खूप गोड असते. ती आपल्या जोडीदाराला कठीण प्रसंगातही साथ देते आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याच्या खांद्याला खांदा लावून चालते. या राशीच्या मुलींबद्दल असे म्हटले जाते की त्यांचा स्वभाव खूप जुळवून घेणारा असतो आणि पार्टनर त्यांच्यासोबत खुश असतो.

तुळ

तूळ राशीच्या मुलींबद्दल असे मानले जाते की त्या अतिशय साध्या व्यक्तिमत्त्वाने समृद्ध असतात. त्या आपल्या जोडीदाराची साथ कधीच सोडत नाही. या राशीच्या मुली आपल्या इच्छा जोडीदारावर लादत नाहीत. कठीण प्रसंगी त्या आपल्या जोडीदाराला एकटे सोडत नाही. या राशीच्या मुलींशी लग्न करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी करू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल