AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 6 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांना नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल.वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल.

Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 6 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांना नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग
राशी भविष्यImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Feb 06, 2023 | 1:00 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेषः

व्यवसाय व्यापारातील जागेचा प्रश्न मिटेल. व्यवसायातील पत वाढेल. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून मदत मिळेल. वारसा अधिकार मिळेल. विमामुळे लाभ होतील. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दुरचे प्रवास घडणार आहेत. नोकरी-व्यवसायानिमिल परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदादी पार पाडाल. दिवसभर मन प्रसन्न राहील. लेखन, कला क्षेत्रातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. मातेच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या.

वृषभः

कर्ज प्रकरण मंजूर होतील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभदिवस आहे. स्वता:ला सिद्ध कराल. मित्रांकडून मदत मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात यश येईल. अपयशाची भिती न बाळगता कष्ट करत रहा. यशदायक दिनमान आहे.

मिथुनः

व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक,आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या.भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.

कर्कः

नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. शुभ संदेश मिळतील. घरात आप्तेष्ट नातेवाईकांचे आगमन होईल. आत्मसन्मान वाढेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील. संशोधन पर अभ्यासाच्या प्रारंभास आजचा दिवस उत्तम आहे. मनात प्रसन्नता असेल. मित्र मैत्रिणीकडून सहकार्य लागेल. प्रसन्नता पूर्वक दिवस आहे.

सिंहः

काही मनस्तापासारख्या घटना घडतील. ताणतणाव जाणवेल. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. आर्थिक व्यवहार अत्यंत सावधानीपूर्वक करावेत. जामीन राहू नका. कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. काहीसा अडचणीत आणणारे दिनमान राहील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. धाडसी निर्णय घेऊ नयेत. मित्रमैत्रिणींबरोबर व्यवहार करताना जपून करा. अनिद्रेचा त्रास होऊ शकतो. मन अस्वस्थ राहील. प्रकृतीवर लक्ष द्या.

कन्याः

पुर्वीचे प्रकल्प व कामे आज आपणास मदतीला येणार आहेत. धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नव-नवीन कल्पना आमलात आणा. क्रिएटिव मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकरिता आज शुभ योग आहे. शासकीय योजना आणल्या जातील. रखडलेले प्रकल्प पुर्णत्वास जातील.शेअर बाजार मधील कामासाठी शुभ दिवस आहे.आपल्या हातून शुभ कार्य घडतील. स्त्रीयांकडून विशेष लाभ होईल.लाभदायक दिनमान असेल.

तुलाः

नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे योगआहेत.काहींना नोकरीत प्रमोशन मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. नातेवाईकाकडून सहकार्य लाभेल.

वृश्चिकः

सर्वच बाबतीत समाधान लाभेल. मनाप्रमाणे घटना घडतील. आध्यात्मिक, देवधर्म यावर श्रद्धा वाढेल. मंगलकार्य, धार्मिक कार्य घडतील. नोकरदारांना नोकरीत उत्कृष्ट प्रस्ताव येतील.वरिष्ठांची मर्जी राखाल.भाग्याची साथ आपणास उत्तम मिळणार आहे.व्यवसायात उत्तम लाभ होतील. घरातील आनंदी वातावरण मानसिक,सौख्य देणारं असेल.व्यापार व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. शासकीय कामकाजात शुभ दिवस आहे. उपासना व गुढशास्त्राची आवड निर्माण होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह लाभेल.

धनुः

मनस्वास्थ सांभाळा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बोलघेवडेपणा शक्यतो टाळा. अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. शक्यतो आज प्रवास टाळावा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. अपप्रवृत्तींवर नियंत्रण ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्या. चिंता वाढविणारा दिवस असुन मनावर नियंत्रण ठेवून आज वाटचाल करा.

मकरः

व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत. आंनदायक वातावरण राहील. आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्यावे.

कुंभः

खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारीनुसार काम करा. मनात अशांती असल्याने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायदा पाहून अविचारी गुंतवणूक करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रकृती आस्थिर व बैचेन राहील. आर्थिक हानी नुकसान, फसवणुक होण्याची शक्यता आहे. व्यवहार काळजीने गुप्तशत्रुपासुन त्रास जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या.

मीनः

दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील.नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल.वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे.प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्यामुळे मनोबल उंचावलेले असेल.संततीची प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.