Astrology: धनु राशीत होणार बुधाचे गोचर, भद्रायोगामुळे होणार ‘या’ राशींना फायदा

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

Updated on: Dec 01, 2022 | 4:05 PM

धनु राशीत बुधाचे गोचर होत असल्याने भद्रा योग तयार होत आहे. याचा काही राशींना फायदा होणार आहे.

Astrology: धनु राशीत होणार बुधाचे गोचर, भद्रायोगामुळे होणार 'या' राशींना फायदा
भद्रा राजयोग
Image Credit source: Social Media

मुंबई,  ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) ग्रहांच्या संक्रमणांना विशेष महत्त्व आहे. ग्रहांच्या बदलाचा राशींवर परिणाम होतो. हा परिणाम शुभ आणि अशुभ दोनीही असू शकतो. इतकेच नाही तर जेव्हा एखादा ग्रह एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योगही तयार होतात. याचा राशींवरही परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार 3 डिसेंबरला बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करेल तेव्हा भद्रा राज योग (Bhadra Yoga) तयार होईल. हा राजयोग या 3 राशींना नशीब देईल आणि त्यांना व्यवसाय मोठा नफा मिळेल. या 3 राशींबद्दल जाणून घेऊया:-

हे सुद्धा वाचा

  1. मिथुन राशी: मिथुन राशीच्या लोकांना धनु राशीत बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या भद्र राजयोगाचा खूप फायदा होणार आहे. या काळात मिथुन राशीच्या जातकांना भरपूर यश मिळतील. प्रेमसंबंधांसाठी हा काळ चांगला राहील. विवाहासाठी पात्र लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत सकारात्मकता राहील.
  2. वृषभ: धनु राशीतील बुध ग्रहांचा राजकुमार या राशीच्या लोकांसाठी शुभ मुहूर्त घेऊन येत आहे. या दरम्यान, भद्रा राजयोगामुळे, वृषभ राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो. या दरम्यान, ते जुन्या किंवा दीर्घ आजारांपासून मुक्त होऊ शकतात. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होईल. यामुळे नफाही वाढेल. या काळात तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता कारण जंगम आणि स्थावर मालमत्ता खरेदीसाठी हा काळ चांगला आहे. जे लोक संशोधन क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.
  3. मीन: भद्रा राजयोगाच्या शुभ योगामुळे या लोकांना कार्यक्षेत्रात यश मिळेल. त्यांना नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित लोकांना या काळात पैसे मिळतील. उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI