AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या 4 राशींसाठी मंगळवारचा दिवस असेल खास, मनातील इच्छा होईल पूर्ण

जाणून घेऊया सर्व 12 राशीच्या लोकांचे करिअर, व्यवसाय, नोकरी, आर्थिक आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत आजचा दिवस कसा असेल.

Astrology: या 4 राशींसाठी मंगळवारचा दिवस असेल खास, मनातील इच्छा होईल पूर्ण
जोतिषशास्त्र
| Updated on: Aug 02, 2022 | 6:47 AM
Share

ज्योतिषशास्त्रात वार, तिथी, ग्रह, नक्षत्र या आधारे कुंडली बनविली जाते. 2 ऑगस्ट 2022 रोजी श्रावणातले पहिले मंगळा गौरी व्रत (Mangla Gaouri Vrat) येत आहे आणि नागपंचमी (Nag Panchami 2022) देखील साजरी केली जाईल. चला तर मग जाणून घेऊया सर्व 12 राशीच्या लोकांचे करिअर, व्यवसाय, नोकरी, आर्थिक आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत आजचा दिवस कसा असेल.

  1. मेष: या दिवशी लाभाचे योग आहेत. कामानिमित्त सहलीला जावे लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. उतावीळपणे कोणतेही काम करू नका.
  2. वृषभ: स्वतःवर विश्वास ठेवा. व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसतील. नातेवाईक आणि मित्रांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील.
  3. मिथुन: तुमच्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी विचार करा. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नासाठी स्थळ येऊ शकते.
  4. कर्क: कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. खर्चही वाढतील. आज भाग्य तुमच्या सोबत आहे. आरोग्य आणि मन दोन्ही प्रसन्न राहील. जीवनातील समस्या सोडविण्याची संधी मिळेल.
  5. सिंह: आज अल्पकालीन गुंतवणूक नफा देऊ शकते. व्यापार्‍यांसाठी दिवस शुभ आहे. नोकरदार लोकांवर कामाचा ताण वाढेल. प्रेम जीवनात गैरसमजांमुळे दुरावण्याची शक्यता आहे.
  6. कन्या: उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात वाढ होईल. तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटू शकते. व्यवसाय आणि नोकरीसाठी दिवस शुभ आहे. तुमच्यासाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे.
  7. तूळ: आर्थिक सुरक्षितता वाढेल. तब्येत बिघडू शकते. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात फायदा होईल. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. कामाच्या ठिकाणी मोठा बदल होऊ शकतो.
  8.  

    वृश्चिक: आज इच्छित इच्छा पूर्ण झाल्यामुळे मनोबल वाढेल. मित्रांसोबत चर्चा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अचानक काही खर्चही होऊ शकतो. जोडीदाराशी संबंध दृढ होतील.

  9.  

    धनु: तुम्हाला मित्रांचे सहकार्य मिळेल. कर्ज फेडण्यात यश मिळेल. तब्येत बिघडू शकते. या दिवशी तुळशीची पूजा करणे शुभ राहील. प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

  10. मकर: आज नातेवाईक किंवा मित्राला मदत करण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. अचानक आर्थिक लाभ संभवतो.
  11.  

    कुंभ: आज व्यवसायात लाभासोबतच मान-सन्मान वाढेल. जे बेरोजगार आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. या दिवशी तुळशीला दिवा लावावा. संतानसुख मिळू शकेल.

  12.  

    मीन: आजचा दिवस इच्छा करणे शुभ राहील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. तुमच्या प्रियकराशी एखाद्या गोष्टीबद्दल तणाव असू शकतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.