AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shravan 2022: श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी ठेवतात मंगळागौरी व्रत, महत्त्व आणि पूजा विधी

श्रावण महिना (Shravan 2022) हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. हिंदी भाषिकांचा श्रावण महिना (sawan 2022) 14 जुलैला सुरु झाला आहे. हा संपूर्ण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे. शिव भक्त दर सोमवारी श्रावण सोमवार व्रत पाळतात तर महिला दर मंगळवारी मंगळा गौरी व्रत (Mangla gauri vrat) करातात. असे मानले जाते की, माता पार्वतीने भगवान महादेवाला […]

Shravan 2022: श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी ठेवतात मंगळागौरी व्रत, महत्त्व आणि पूजा विधी
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 1:34 PM

श्रावण महिना (Shravan 2022) हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. हिंदी भाषिकांचा श्रावण महिना (sawan 2022) 14 जुलैला सुरु झाला आहे. हा संपूर्ण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे. शिव भक्त दर सोमवारी श्रावण सोमवार व्रत पाळतात तर महिला दर मंगळवारी मंगळा गौरी व्रत (Mangla gauri vrat) करातात. असे मानले जाते की, माता पार्वतीने भगवान महादेवाला मिळविण्यासाठी असंख्य उपवास केले होते आणि त्यापैकी एक म्हणजे मंगळा गौरी व्रत आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात.  एखाद्याच्या वैवाहिक जीवनात काही संकट आले तर तेही माता पार्वतीच्या कृपेने दूर होतात. जर भक्ताची अपत्यप्राप्तीची इच्छा असेल तर हे व्रत केल्याने त्याची मनोकामनाही पूर्ण होते. यासोबतच उपवास करणाऱ्यांना माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. यंदा श्रावण महिन्यातले पहिले मंगळा गौरी व्रत 19 जुलैला आणि शेवटचे मंगळा गौरी व्रत 9 ऑगस्टला असेल. यामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी भगवान शिव आणि पार्वतीची विशेष पूजा केली जाते.

मंगला गौरी व्रत म्हणजे काय?

मंगळा गौरी व्रत देवी पार्वती म्हणजेच गौरीच्या पूजेला समर्पित आहे. मंगला गौरी व्रत घरातील समृद्धी, उत्तम आरोग्य आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. श्रावण  महिन्यात सोमवारचा उपवास भगवान शिवाला समर्पित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळा गौरीचा उपवास महादेवाची अर्धांगिनी माता पार्वतीला समर्पित केला जातो.

मंगला गौरी व्रताची तिथी

उत्तर भारतीयांचा श्रावण महिना यावेळी 14 जुलैपासून सुरू झाला असून तो 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्रीयन म्हणजेच मराठी लोकांचा श्रावण महिना 29 जुलैपासून सुरु होईल. या श्रावणमध्ये चार मंगळवार आहेत. पहिले मंगळा गौरी व्रत – 19 जुलै 2022, मंगळवार दुसरे मंगळा गौरी व्रत – २६ जुलै 2022, मंगळवार तिसरे मंगला गौरी व्रत – 2 ऑगस्ट 2022, मंगळवार चौथे मंगला गौरी व्रत – 9 ऑगस्ट 2022, मंगळवार

हे सुद्धा वाचा

मंगळा गौरी व्रताची पूजा पद्धत

  1. मंगळवारी सकाळी लवकर उठून व्रताचा  संकल्प करावा.
  2. स्नान वगैरे झाल्यावर देव घरासमोर मंगला गौरी मातेचे व्रत करावे.
  3. यानंतर माता मंगला गौरी म्हणजेच पार्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे.
  4. मूर्तीला लाल वस्त्र परिधान करावे.
  5. यानंतर तुपाने भरलेला पिठाचा दिवा लावून आरती करावी.
  6. यानंतर ओम उमामहेश्वराय नमः या मंत्राचा जप करा.
  7. मातेला फुले, लाडू, फळे, सुपारी, वेलची, लवंग, सुपारी, मध आणि पेठे अर्पण करा.
  8. यानंतर मंगला गौरीची कथा ऐका.
  9. पूजेनंतर घरच्यांना प्रसाद वाटप करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

इंद्रायणी पूल दुर्घटनेचं कारण आलं समोर, या एका कारणामुळंच पूल कोसळला
इंद्रायणी पूल दुर्घटनेचं कारण आलं समोर, या एका कारणामुळंच पूल कोसळला.
अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट
अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट.
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार.
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत.
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण.
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं.
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्..
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्...
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर.
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला.