
प्रत्येकाला आपलं भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपल्या आयुष्यात पुढील काळात काय घटना घडणार आहेत, याबाबत सर्वांनाच जाणून घ्यायचं असतं. त्यासाठी आपण ज्योतिष शास्त्राचा आधार घेतो.भविष्यवेत्त्याकडे जातो. जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. बाबा वेंगा या एक प्रसिद्ध ज्योतिषी होत्या, त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली, त्यातील अनेक गोष्टी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. आता बाबा वेंगा यांचं आणखी एक भाकीत समोर आलं आहे, ज्यामध्ये पृथ्वीवर आणखी 145 वर्षांनी भीषण दुष्काळ पडले, पाणी मिळणार नाही. पृथ्वीचं रूपांतर वाळवंटात होईल,असा दावा करण्यात आला आहे.
बाबा वेंगा यांनी आपल्या आयुष्यात अनेक भाकीत वर्तवली त्यातील काही भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. ज्यामध्ये त्यांनी अमेरिकेवर झालेला हल्ला, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, हिटलरचा मृत्यू, जपामध्ये आलेली त्सुनामी अशा काही गोष्टींबद्दल भाकीत केलं होतं त्या गोष्टी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.
बाबा वेंगा यांनी 2025 बद्दल देखील मोठं भाकीत केलं आहे. 2025 मध्ये जगभरात शक्तिशाली भूकंप होतील. महापुराचं संकट येईल, युरोपीयन देशांमध्ये भीषण युद्ध होईल, ज्याचा मोठा फटका हा पश्चिमेकडील राष्ट्रांना बसेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीलाच काही देशांना भूकंपाचे धक्के बसले, त्यामध्ये मोठं नुकसान झालं, त्यामुळे बाबा वेंगा यांची हे भाकीत खरं ठरल्याचा दावा केला जातो.
कोण होत्या बाबा वेंगा
बाबा वेंगा यांचा जन्म बुल्गारियामध्ये 1911साली झाला, त्यांनी लहानपणीच आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती, मात्र त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याचा दावा केला जातो. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक मोठ्या घटनांचे भाकीतं केली, त्यातील काही घटना खऱ्या ठरल्याचं मानलं जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)