AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga predicts : तिसऱ्या महायुद्धाचं कारण समोर; बाबा वेंगा यांचं हादरून सोडणारं भाकीत, एक छोटा देश…

बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली होती, त्यातील काही भाकीतं खरी ठरल्यामुळे अनेकांना बाबा वेंगा यांच्या भाकीतांबाबत उत्सुकता असते. तिसऱ्या महायुद्धाबाबत त्यांनी मोठं भाकीत केलं आहे.

Baba Vanga predicts : तिसऱ्या महायुद्धाचं कारण समोर; बाबा वेंगा यांचं हादरून सोडणारं भाकीत, एक छोटा देश...
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 30, 2025 | 6:07 PM
Share

जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते. त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव आघाडीवर असतं, बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला होता. तर मृत्यू 1996 साली झाला. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक मोठे भाकीतं केली, त्यातील काही भाकीतं खरी ठरल्याचा दावा बाबा वेंगा यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. बाबा वेंगा यांच्यासंदर्भात असा देखील दावा केला जातो की, एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्याची दृष्टी गमावली. त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. बाबा वेंगा यांनी आपल्या आयुष्यात अनेक मोठी भाकीत केली आहे. दरम्यान आता त्यांचं आणखी एक मोठं भाकीत समोर आलं आहे.

बाबा वेंगा यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत मोठं भाकीत केलं आहे. 2123 मध्ये म्हणजे 98 वर्षांनंतर तिसरं महायुद्ध होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. जगभरातील छोटे-छोटे देश एकमेकांसोबत लढतील, यामुळे जगात तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. या युद्धात एकही मोठा देश भाग घेणार नाही, असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांनी आपल्या भाकीतामधून असा देखील संकेत दिला आहे की, आणखी 100 वर्षांनी मोठे देश एवढे प्रगत होतील की त्यांना एकमेकांसोबत लढण्याची गरजच राहणार नाही. मात्र जे छोटे देश आहेत, ते आपल्या पेक्षा छोट्या देशांवर सत्ता गाजवण्यासाठी दबाव निर्माण करू शकतात, याच वादातून कदाचित तिसरं महायुद्ध होऊ शकतं असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांचं हे भाकीत किती खरं होणार? हे आता येणारा काळच सांगू शकतो.

बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली होती, त्यातील काही भाकीतं खरी ठरल्यामुळे अनेकांना बाबा वेंगा यांच्या भाकीतांबाबत उत्सुकता असते. हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, जपमानमध्ये आलेली त्सुनामी, अमेरिकेवर झालेला हल्ला याबाबत बाबा वेंगा यांनी भाकीतं केलं होतं, ते खरं ठरल्याचा दावा केला जातो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक