AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandra Gochar 2023 : एप्रिल महिन्यात 13 वेळा चंद्र बदलणार राशी, जाणून घ्या शुभ-अशुभ योगाची स्थिती

ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह आहे. एका राशीत चंद्र जवळपास सव्वा दोन दिवस राहतो. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती असते. एप्रिल 2023 महिन्यात चंद्र 13 वेळा राशी बदल करणार आहे.

Chandra Gochar 2023 : एप्रिल महिन्यात 13 वेळा चंद्र बदलणार राशी, जाणून घ्या शुभ-अशुभ योगाची स्थिती
चंद्राच्या स्थितीमुळे एप्रिल महिन्यात शुभ अशुभ योगांची स्थिती, कसं असेल भ्रमण जाणून घ्या
| Updated on: Mar 24, 2023 | 2:00 PM
Share

मुंबई : राशीमंडळात प्रत्येक ग्रहाचं असं अस्तित्व आहे. त्यामुळे कोणताही ग्रह छोटा किंवा मोठा नाही. कारण प्रत्येक ग्रह आपल्या स्वभानुसार फळं देत असतो. त्यात गोचर कालावधीत एखाद्या ग्रहासोबत युती आघाडी झाली तर शुभ अशुभ योग जुळून येतात. चंद्र हा सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह आहे. त्यामुळे इतर ग्रहांसोबत युती आघाडी होतच असते. एप्रिल 2023 या महिन्यात चंद्र ग्रह 13 वेळा गोचर करणार आहे. 2 एप्रिलला पहिलं गोचर असेल आणि 29 एप्रिलला शेवटचं गोचर असणार आहे. चला जाणून घेऊयात गोचर आणि योगांची स्थिती…

चंद्र गोचर एप्रिल 2023

2 एप्रिल 2023 रोजी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत सध्या कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडीचा प्रश्नच येत नाही. सकाळी 4 वाजून 48 मिनिटांनी हा प्रवेश असेल.

4 एप्रिल 2023 रोजी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी हा प्रवेश असेल. कन्या राशीत इतर ग्रह नसल्याने कोणताच योग जुळून येत नाही.

7 एप्रिल 2023 रोजी चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी हा प्रवेश असेल. तूळ राशीत केतू ग्रह असल्याने चंद्राच्या आगमनाने ग्रहण योग तयार होईल. हा अशुभ योग मानला जातो.

9 एप्रिल 2023 रोजी चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सकाळी 8 वाजून 2 मिनिटांनी हा प्रवेश असणार आहे. त्यामुळे शुभ अशुभ योगाची स्थिती नसेल.

11 एप्रिल 2023 रोजी वृश्चिक राशीतून चंद्र धनु राशीत प्रस्थान करेल. दुपारी 12 वाजून 58 मिनिटांनी या राशीत सव्वा दोन दिवसांसाठी ठाण मांडेल. धनु राशीतही तसा कोणताच ग्रह नाही.

13 एप्रिल 2023 रोजी चंद्र धनु राशीतून मकर राशीत विराजमान होईल. संध्याकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी या राशीत बसणार आहे. मकर राशीतही सध्या कोणताच ग्रह नाही. त्यामुळे शुभ अशुभ युतीचा प्रश्न येत नाही.

15 एप्रिल 2023 रोजी चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रस्थान करेल. संध्याकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी हा प्रवेश असेल. त्यामुळे या राशीत असलेल्या शनिदेवांसोबत युती होईल. या युतीला ज्योतिषशास्त्रात विष योग म्हंटलं जातं. त्यामुळे अशुभ परिणाम दिसून येतील.

17 एप्रिल 2023 रोजी चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत रात्री 8 वाजून 51 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. त्यामुळे गुरुच्या सान्निध्यामुळे गजकेसरी योग जुळून येईल. सव्वा दोन दिवस हा योग असणार आहे.

19 एप्रिल 2023 रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. या राशीत राहु, बुध, सूर्य आधीच ठाण मांडून असतील. त्यानंतर 22 एप्रिलला गुरु ग्रहाची एन्ट्री होईल. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती असेल. राहुसोबत युतीमुळे ग्रहण योग असेल. तर गुरुसोबतच्या युतीमुळे गजकेसरी योग जुळून येईल. चंद्र सूर्याची युती अशुभ फळ देईल.बुध चंद्र योगाला राजयोग म्हंटलं जातं.

22 एप्रिल 2023 रोजी चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. सकाळी 5 वाजून 2 मिनिटांनी चंद्र या राशीत प्रवेश करेल. या राशीत चंद्र आणि शुक्राच्या युतीमुळे कलात्मक योग तयार होईल.

24 एप्रिल 2023 रोजी चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल.दुपारी 1 वाजून 12 मिनिटांनी हा प्रवेश असणार आहे. या राशीत कोणताच ग्रह नाही. त्यामुळे शुभ अशुभ युती असं काहीच नसेल.

27 एप्रिल 2023 रोजी चंद्र मिथुन राशीतून स्वरास असलेल्या कर्क राशीत प्रवेश करेल. मध्यरात्री 12 वाजून 18 मिनिटांनी हा प्रवेश असेल. कर्क राशीत मंगळ ग्रह असणार आहे. चंद्र आणि मंगळाच्या युतीला लक्ष्मी योग संबोधलं जातं.

29 एप्रिल 2023 रोजी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत सध्या कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडीचा प्रश्नच येत नाही. दुपारी 12 वाजून 47 मिनिटांनी हा प्रवेश असेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?