AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2023 : दिवाळीत घरी आणा या शुभ वस्तू, लक्ष्मीच्या आशिर्वादाने वाढेल आर्थिक आवक

या दिवशी देवी लक्ष्मीचे घरी आगमन होते असे मानले जाते. अशा वेळी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर काही शुभ गोष्टी आणल्या तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. दिवाळी निमित्त रांगोळी शुभाचे प्रतीक म्हणून काढल्या जातात.लक्ष्मीच्या स्वागतासाठी ही रांगोळी काढल्या जाते. लक्षात ठेवा रांगोळीमध्ये काळा रंग असता कामा नये. 

Diwali 2023 : दिवाळीत घरी आणा या शुभ वस्तू, लक्ष्मीच्या आशिर्वादाने वाढेल आर्थिक आवक
दिवाळी २०२३ Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 19, 2023 | 5:03 PM
Share

मुंबई : यंदा 10 नोव्हेंबरपासून दिवाळीला (Diwali 2023) सुरूवात होणार आहे. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सर्वत्र दिवे लावले जातात. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीचे घरी आगमन होते असे मानले जाते. अशा वेळी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर काही शुभ गोष्टी आणल्या तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. दिवाळीत प्रत्येक घरात दिवे लावले जातात. या दिवशी घराच्या प्रत्येक भागात प्रकाश असावा असे म्हणतात. याशिवाय घराची सजावटही चांगली असावी. लक्ष्मीच्या आगमनाची पूर्ण तयारी करावी. दिवाळीच्या आधी काही वस्तू घरी घेऊन आल्यास आर्थिक आवक वाढते.

दिवाळीच्या आधी या वस्तू करा खरेदी

धातूचे कासव

हिंदू धर्मात धातूचे कासव शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत दिवाळीच्या मुहूर्तावर धातूचे कासव घरी आणल्यास घरात सुख-समृद्धी येते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोने, चांदी किंवा पितळी कासवही घरी आणू शकता. यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

लक्ष्मी कुबेर मुर्ती

दिवाळीत लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर देव यांची पूजा केली जाते. अशा परिस्थितीत दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर लक्ष्मी आणि कुबेरजींच्या मूर्ती घरी आणणे शुभ मानले जाते. अशा प्रकारे व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होते.

मातीच्या वस्तू

मातीची भांडी फक्त आरोग्यासाठी चांगली नसून ती शुभ मानली जातात. अशा स्थितीत दिवाळीच्या दिवशी मातीचे भांडे घरी आणा आणि त्यात पाणी भरून घराच्या उत्तर दिशेला ठेवा. यामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

या गोष्टीही करा

दरवाजा सजवा

घराचा मुख्य दरवाजा जिथून लक्ष्मी आणि सौभाग्य घरात प्रवेश करतात. त्यामुळे ते सुंदर, स्वच्छ असणे आणि त्यावर स्वस्तिक, शुभ-लाभ किंवा गणेशजी इत्यादी कोणतेही शुभ चिन्ह असणे अत्यंत हितकारक मानले जाते. सणासुदीच्या दिवसात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंबा, अशोक किंवा फुलांची ताजी हिरवी पाने बांधणे शुभ आणि समृद्ध मानले जाते.

पाण्याने भरलेले कंटेनर ठेवा

वास्तूनुसार, ईशान कोपरा (उत्तर-पूर्व) हे पाणी आणि देवाचे स्थान मानले जाते आणि येथे सर्वात सकारात्मक ऊर्जा वास करते. ही दिशा स्वच्छ ठेवून येथे पाण्याचे भांडे ठेवल्याने सौभाग्य वाढते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. दिवाळीच्या सजावटीसाठी तुम्ही मातीची वाटी पाण्याने भरून त्यात फुलांच्या पाकळ्याही ठेवू शकता.

रांगोळी

दिवाळी निमित्त रांगोळी शुभाचे प्रतीक म्हणून काढल्या जातात.लक्ष्मीच्या स्वागतासाठी ही रांगोळी काढल्या जाते. लक्षात ठेवा रांगोळीमध्ये काळा रंग असता कामा नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत