Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातून बाहेर पडताना या गोष्टी करायला विसरू नका, यश तुमचंच!

जेव्हा तुम्ही कोणतंही शुभ काम करण्यासाठी घरातून बाहेर पडतात. जसं की इंटरव्ह्यू देण्यासाठी, एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, लग्नाची बोलणी करण्यासाठी अशा कामांसाठी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा काही नियमांचं कटाक्षानं पालन करा.

घरातून बाहेर पडताना या गोष्टी करायला विसरू नका, यश तुमचंच!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2025 | 12:06 AM

जेव्हा तुम्ही कोणतंही शुभ काम करण्यासाठी घरातून बाहेर पडतात. जसं की इंटरव्ह्यू देण्यासाठी,एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, लग्नाची बोलणी करण्यासाठी अशा कामांसाठी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा काही नियमांचं कटाक्षानं पालन करा. तुम्ही जेव्हा- जेव्हा घरातून बाहेर पडतात तेव्हा-तेव्हा जर या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकतं.

तुम्ही जर घरातून बाहेर पडताना काही नियमांचं नित्यनियमाने पालन केलं तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. हळूहळू तुमचं नशीब देखील तुमची साथ देईल. तुम्हाला अनेकदा असं जाणवलं असेल की तुम्ही एखादं काम करण्यासाठी बाहेर पडलात मात्र त्या कामामध्ये काही तरी अडचणी आल्या, ते काम पूर्ण होऊ शकलं नाही. जर तुम्हाला अशा गोष्टींपासून वाचायचे असेल तर ज्योतिष शास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत, काही उपाय सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात घराच्या बाहेर पडताना कोणत्या गोष्टींचं पालन करायचं

ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही घरातून बाहेर पडत आहात आणि त्याचवेळी कोणी शिंकलं तर घरातून बाहेर पडलं नाही पाहिजे.अशावेळी घरातून बाहेर पडणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही वेळासाठी घरातच थांबा, त्यानंतर घरातून बाहेर पडा. तुम्हाला जेव्हा घरातून बाहेर पडायचं असेल तेव्हा पाणी प्या आणि मगच घराच्या बाहेर पडा. तुम्ही घराच्या बाहेर पडताना एखादी व्यक्ती दोनदा शिंकली तर याचा अर्थ असा की तुम्ही ज्या कामाला जाणार आहात ते तुमचं काम पूर्ण होणार आहे.

तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही तुमची नासिका अर्थात नाकांच्या स्वरावर लक्ष द्या, जर डाव्या बाजुने जर स्वर असेल तर तुमचा डावा पाय आधी घराच्या बाहेर ठेवा आणि जर उजव्या बाजुनं स्वर असेल तर तुमचा उजवा पाय घराच्या बाहेर ठेवा.असं केल्यानं तुम्ही ज्या कामासाठी घरातून बाहेर पडणार असाल त्या कामात तुम्हाला यश मिळेल, कामात काही अडथळे येत असतील तर ते दूर होतील असं ज्योतिष शास्त्रा सांगतं

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'.
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी.
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल.
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं.
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल.
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं.
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप.