AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Gochar : वृषभ राशीत 12 वर्षानंतर गुरु ग्रहाचं गोचर, पुढच्या वर्षी या राशींना मिळणार गुरुबळ

ज्योतिषशास्त्र पूर्णत: ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून आहे. कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला आहे. त्याची फळं कशी मिळतात यावरून भाकीत केलं जातं आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. त्यात गुरुचं पाठबळ असेल तर किचकट कामंही चुटकीसरशी पूर्ण होतात. आता गुरु ग्रह 12 वर्षानंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

Guru Gochar : वृषभ राशीत 12 वर्षानंतर गुरु ग्रहाचं गोचर, पुढच्या वर्षी या राशींना मिळणार गुरुबळ
Guru Gochar : वृषभ राशीतील गुरु गोचर राशीचक्रावर करणार मोठा परिणाम, तीन राशींचं होणार भलं
| Updated on: Dec 13, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई : गुरु ग्रह एका राशीत जवळपास वर्षभर ठाण मांडून बसतो. त्यामुळे एका राशीत पूर्ण चक्र फिरून येण्यास वर्षांचा कालावधी लागतो. 12 वर्षानंतर गुरु ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह सध्या मेष राशीत आहे. 30 एप्रिल 2024 पर्यंत ठाण मांडून बसणार आहे. त्यानंतर 1 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजून 59 मिनिटांनी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. या दरम्यान गुरु ग्रह 12 जूनला रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. 9 ऑक्टोबरला गुरु ग्रह वक्री होईल आणि 4 फेब्रुवारी 2025 ला मार्गी होईल. तर 14 मे 2025 रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. म्हणजेच पुढच्या वर्षी गुरु ग्रह वृषभ राशीत असेल. त्यामुळे राशीचक्रात बरीच उलथापालथ पाहायला मिळेल. खासकरून तीन राशीच्या जातकांना लाभ मिळेल. वृषभ राशीच्या लग्न स्थानात, मेष राशीच्या द्वितीय, मीन राशीच्या तृतीय, कुंभ राशीच्या चतुर्थ, मकर राशीच्या पंचम, धनु राशीच्या षष्टम, वृश्चिक राशीच्या सप्तम, तूळ राशीच्या अष्टम, कन्या राशीच्या नवम, सिंह राशीच्या दशम, कर्क राशीच्या एकादश आणि मिथुन राशीच्या द्वादश भावात गुरु असेल.

या तीन राशींचं होणार भलं

मेष : या राशीच्या द्वितीय स्थानात म्हणजेच धन आणि वाणी स्थानात गुरु गोचर करणार आहे. त्यामुळे या कालावधीत अचानक धनलाभ होऊ शकतो. आत्मिविश्वास भरूभरून दिसून येईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. तसेच या कालावधीत केलेली गुंतवणूक फलदायी ठरेल.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळेल.

कर्क : या राशीच्या एकादश भावात गुरु ग्रह गोचर करणार आहे. हे स्थान उत्पन्नाचं स्थान गणलं जातं. या स्थानात गुरु ग्रह आल्याने भरभराट होईल. गुरुचं उत्तम पाठबळ लाभेल. उत्पन्नात जबरदस्त वाढ होईल. या कालावधीत संपत्ती किंवा व्यवसायात केलेली गुंतवणूक फलदायी ठरेल. उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत तयार होतील. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह : या राशीच्या कर्म स्थानात म्हणजेच दशम स्थानात गुरु ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना गुरुचं पाठबळ मिळणार आहे. नोकरी व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. तसेच समाजात मानसन्मान मिळेल. सरकारी कामं झटपट पूर्ण होतील. तसेच व्यवसायिकांना अकस्मात धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना नोकरी मिळू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.