AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 2023: 10 सप्टेंबरला तयार होणार रवि पुष्य योग, तीन राशींना मिळणार नशिबाची साथ

Ravi Pushya Yog 2023 : रवि पुष्य योग शुभ योगांपैकी एक आहे. 10 सप्टेंबर 2023 रोजी हा योग जुळून येणार आहे. यामुळे तीन राशींचं नशिब चमकणार आहे.

Horoscope 2023: 10 सप्टेंबरला तयार होणार रवि पुष्य योग, तीन राशींना मिळणार नशिबाची साथ
Astrology 2023 : तीन राशींसाठी 10 सप्टेंबरचा रविवार असेल खास, रवि पुष्य योगामुळे नशिब फळफळणार
| Updated on: Sep 06, 2023 | 4:48 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्र हे 12 राशी, नऊ ग्रह आणि 27 नक्षत्रांवर आधारित आहे. 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र गणलं जातं.पुष्य नक्षत्राचं स्वामित्व शनिकडे आहे. पुष्य नक्षत्र गुरुवार किंवा रविवारी आलं की शुभ मानलं जातं. गुरुवारी पुष्य नक्षत्र असलं की गुरुपुष्यामृत योग असतो. रविवारी पुष्य नक्षत्र आलं की, रविपुष्य योग म्हणून संबोधलं जातं. हा अंत्यत दुर्लभ योग गणला जातो. 10 सप्टेंबर 2023 रोजी रविवार असून या दिवशी पुष्य नक्षत्र असल्याने रवि पुष्य योग जुळून आला आहे. या दिवशी एकादशी असल्याने या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. हा योग 10 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी सुरु होईल आणि 11 सप्टेंबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी सोनं-चांदी, वाहन, घर किंवा संपत्ती खरेदी करणं शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस काही राशींसाठी खास असणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या त्या..

या राशींना मिळणार रविपुष्य योगाचा लाभ

मिथुन : या राशीच्या जातकांना रवि पुष्य योग लाभदायी ठरणार आहे. देवी लक्ष्मीची कृपा या राशीच्या जातकांवर असेल. उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत खुले होतील. तसेच नशिबाची पूर्ण साथ या कालावधीत मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल आणि त्यामुळे काही मोठे निर्णय घेऊ शकता. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांवर पडेल.

सिंह : या राशीच्या जातकांनाही दुर्लभ अशा रवि पुष्य योगाचा लाभ मिळेल. सूर्याची ही स्वरास असून यात राशीत सूर्यदेव आहेत. त्यात पुष्य नक्षत्र असल्याने या राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य ठरेल. वाहन किंवा संपत्ती खरेदीचं स्वप्न पूर्ण होईल.

तूळ : या राशीच्या जातकांनाही विशेष लाभ मिळणार आहे. कौटुंबिक स्तरावर चांगला वेळ व्यतित कराल. आई वडिलांसोबत गेल्या दिवसात खराब झालेले संबंध सुधारतील. करिअरमध्ये योग्य ती उंची गाठाल. समाजात मानसन्मान वाढेल. व्यवसायात जितकी मेहनत घ्याल त्याच्या दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. मुलांकडून काही चांगल्या बातम्या कानावर पडतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी