AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dia Mirza Diwali Controversy : दिया मिर्झाला हिंदू विरोधी ठरवण्याची मुंबई हाय कोर्टाने घेतली गंभीर दखल, BMC, भाजप नेत्यांना झटका देणारा आदेश दिला

Dia Mirza Diwali Controversy : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या फटाक्यांबाबतच्या व्हिडिओवरुन सुरु असलेल्या राजकारणावर हाय कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांच्या टिकाटिप्पणीवर हायकोर्ट नाराज आहे

Dia Mirza Diwali Controversy : दिया मिर्झाला हिंदू विरोधी ठरवण्याची मुंबई हाय कोर्टाने घेतली गंभीर दखल, BMC, भाजप नेत्यांना झटका देणारा आदेश दिला
Mumbai Mayor-Dia Mirza
| Updated on: Nov 03, 2026 | 12:58 PM
Share

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने पर्यावरणपूरक दिवाळी सण साजरा करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हाव हा तिचा त्यामागे उद्देश होता. मुंबई महापालिका सेलिब्रिटींच्या माध्यमातून पर्यावरणपूरक दिवाळी सण साजरा व्हावा यासाठी एक मोहिम राबवत आहे. त्यासाठी विविध सेलिब्रिटींनी व्हिडिओ बनवले. त्यात दिया मिर्झा सुद्धा होती. दिया मिर्झाने व्हिडिओमधून फटाकेविरोधी संदेश दिला होता.दिवाळीत फटाके फोडा पण कमी फोडा असं तिचं म्हणणं होतं. त्यावरुन तिला भाजपच्या काही नेत्यांनी हिंदू विरोधी ठरवलं. तिचा व्हिडिओ पालिकेच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन हटवण्यात आला. या सगळ्या प्रकाराची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाची भूमिका ही मुंबई महापालिका आणि भाजपं नेत्यांना एक धक्का आहे.

अभिनेत्री दिया मिर्झाने फटाके न फोडण्याचं आवाहन केलं होतं. या व्हिडिओवर राजकीय नेत्यांनी केलेल्या टीकेची मुंबई हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने दिया मिर्झाचा हा व्हिडिओ हटवला. “दिवाळी कशी साजरी करावी याबद्दल दिया मिर्झाकडून धडे घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा, संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत” असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं. ‘दिया मिर्झा हिंदू विरोधी भूमिका घेते’ असं मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या. काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आपण अस्वस्थ असल्याचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ.नीला गोखले यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवलं.

हायकोर्टाने काय म्हटलं?

“भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे,” असे स्पष्ट करत राजकीय नेत्यांना हायकोर्टाने सुनावले. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, या न्यायालयाच्या निर्देशांबाबत जनजागृती करण्यासाठी BMC च्या विनंतीवरून दिया मिर्झाने हा व्हिडिओ बनवला होता. भाजप नेत्यांनी दिया मिर्झाला ‘हिंदूविरोधी’ ठरवत आक्षेप घेतल्यानंतर BMC च्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ हटवण्यात आला. हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचे हाय कोर्टाने मुंबई पालिकेला निर्देश दिले आहेत. या प्रकरणात राजकीय टीकेवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.

भारत धर्मनिरपेक्ष देश

दिया मिर्झाने फटाक्यांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाबाबत दिलेल्या जनजागृती संदेशाचे मुंबई हायकोर्टाकडून कौतुक आहे. “न्यायालयाच्या आदेशानुसारच दिया मिर्झाने व्हिडिओ बनवला होता, मग तिच्या सहभागाला विरोध का?” असा न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांचा सवाल. “हा पूर्णपणे पर्यावरणाचा विषय आहे, त्याला दुसरा कोणताही रंग देऊ नका. प्रत्येकजण एकच हवा श्वासातून घेत आहे” असे न्यायमूर्ती नीला गोखले यांनी सुनावले. “भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. दुसऱ्या धर्मातील व्यक्ती आहे म्हणून तिला सण साजरा करण्यापासून किंवा जनजागृतीत सहभागी होण्यापासून कसे रोखू शकता?” असा हायकोर्टाचा सवाल. फटाक्यांवर निर्बंध म्हणजे सण साजरा करण्याचा अधिकार हिरावून घेणे नव्हे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

त्याला विरोध होणे दुर्देवी आणि अस्वस्थ करणारे

“पर्यावरण संवर्धनासाठी सेलिब्रिटींनी निःस्वार्थपणे पुढाकार घेतला, मात्र त्याला विरोध होणे दुर्देवी आणि अस्वस्थ करणारे असल्याचे निरीक्षण.मुंबईसारखे शहर एकोप्याच्या आणि परस्पर सामंजस्याच्या भावनेवर टिकून आहे, त्याला बेजबाबदार वक्तव्यांमुळे धक्का लागू नये” असे न्यायालयाचे मत आहे. कोणत्याही व्यक्तीला भारतात कोणताही सण साजरा करण्यापासून वेगळे ठेवता येणार नाही, असे खंडपीठाने बजावले. BMC ने सोशल मीडियावरून हटवलेला दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करून नागरिकांचा विश्वास कायम ठेवावा, असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिले.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर
गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने...
Gokul : Mahayuti : गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून
Mahayuti : गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून महायुतीत नाराजीचा सूर
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी
NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी
सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष
अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील....
District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत