AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशीभविष्य 21 April 2025 : कोणाचा प्रियकर आज नाराज होणार, तर कोणाला अचानक धनलाभ…; तुमच्या राशीत आज काय?

Horoscope Today 21 April 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 21 April 2025 : कोणाचा प्रियकर आज नाराज होणार, तर कोणाला अचानक धनलाभ...; तुमच्या राशीत आज काय?
Horoscope Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2025 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 21 April 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

मेष राशीच्या व्यक्तींना आज विनाकारण धावपळ करावी लागेल. ज्यामुळे मन उदास राहील. बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो. मालमत्तेसंबंधी न्यायालयीन प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

वृषभ राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. व्यवसायात नवीन संधी येतील. पण भागीदारीने व्यवसाय करणे टाळा. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावध राहावे. तुमचे मन सतत चिंतेत राहील

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. कारण तुम्ही नवीन वाहन खरेदी कराल. यामुळे तुमची अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन कामात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कायदेशीर बाबींमध्ये चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबात तुमच्या मताचा आदर केला जाईल. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)      

सिंह राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनलाभ संभवतो. वाहन चालवताना मात्र अधिक काळजी घ्या. व्यवसायात भागीदारीचे करार टाळण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठ लोकांकडून सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीच्या व्यक्तींना आज मानसिकरित्या गोंधळलेल्या असतील. त्यामुळे कोणताही निर्णय घेणे कठीण जाईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. यामुळे मान-सन्मानात वाढ होईल. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना भान ठेवा.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल. व्यवसायात नफा होईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही वादात पडू नका. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहील.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. विरोधकांपासून सावध राहा. इतरांच्या गोष्टीत ढवळाढवळ करू नका. आरोग्यात सुधारणा दिसेल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल. एखादा जुना मित्र बऱ्याच दिवसांनी भेटेल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

मकर राशीच्या व्यक्तींचे मन आज काही गोष्टींमुळे चिंतित राहू शकते. कामात किंवा व्यवसायात बदल करावे लागतील. पण धोकादायक निर्णय घेणे टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे तुमचा प्रियकर नाराज होईल. एखाद्या कामासाठी प्रवास करावा लागेल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात नफा होईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्यात सुधारणा जाणवेल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खरेदी करण्यात जाईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयाने आनंदी राहतील. व्यवसायात चांगली कमाई होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....